शहरातील कब्रस्तान व बारा इमाम कोठल्याच्या पायाभूत सुविधांसाठी आमदार संग्राम जगाताप यांचा पाठपुरावा
अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडे निधीची मागणी
अहमदनगर (संस्कृती रासने )-
शहरातील मुस्लिम कब्रस्तान, बारा इमाम कोठला व जिल्हाधिकारी कार्यालय ते रामचंद्र खुंट रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले. तर विविध विकासकामासाठी अडीच कोटी पर्यंत निधी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरा जवळ असलेल्या मौजे नागरदेवळे (ता. नगर) येथील टोली मस्जिद मुस्लिम कब्रस्तानची संरक्षक भिंत व अंतर्गत मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी, प्रभाग क्रमांक 3 मधील मुकुंदनगर येथील कब्रस्तानची संरक्षक भिंत बांधणे, शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय ते रामचंद्र खुंट रस्त्याचे कॉक्रीटीकरण करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच आमदार अरुणकाका जगताप यांच्या वतीने विशेष बाब म्हणून शहरातील बारा इमाम कोठला परिसरात पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सदर निधी लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे.
प्रस्तावित काम असलेल्या मुस्लिम कब्रस्तानची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेऊन निधीसाठी पाठपुरावा केलेला आहे. तसेच बारा इमाम कोठल्याचा विकास साधण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ते रामचंद्र खुंट रस्ता अत्यंत खराब झाला असून, लवकरच निधी मंजूर होऊन काम पुर्णत्वास जाणार असल्याची अपेक्षा राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांनी व्यक्त केली. तर आमदार जगताप यांनी केलेल्या कब्रस्तान व इतर विकास कामासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने आभार मानले.