‘सावली’ च्यावतीने सावंत कुटुंबास अन्नधान्य व किराणा भेट.

सावली प्रकल्पाच्या वतीने सावंत कुटुंबातील मुलांना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य देण्याची तयारी

ऋषिकेश राऊत

              अहमदनगर येथील ‘संकल्प’ प्रतिष्ठान संचालित सावली प्रकल्पाच्या वतीने घोडेगाव येथील नाथपंथी डवरी गोसावी समाजातील मयत शिवाजी एकनाथ सावंत या युवकांच्या निराधार कुटुंबास महिनाभर पुरेल एवढे धान्य, किराणा, साडी चोळी भेट देण्यात आला.
               सावली प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष नितेश बनसोडे यांच्या हस्ते सावित्री शिवाजी सावंत यांच्याकडे अन्नधान्य किराणा व साडीचोळी सुपूर्द करण्यात आली. यावेळी एकनाथ सावंत, निलाबाई सावंत, महात्मा फुले बाल संगोपन केंद्राचे संचालक काशिनाथ चौगुले आदी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

                                नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील शिवाजी एकनाथ सावंत या ३५ वर्षीय युवकाचा दोन महिन्यांपूर्वी घोडेगाव येथे विहिरीत पडून आकस्मिक मृत्यू झाला होता. त्यामुळे सावंत कुटुंबीय निराधार झाले. शिवाजी सावंत यांचे आई वडील अर्धांगवायूच्या आजाराने त्रस्त आहेत. शिवाजी सावंत यांच्या दोन लहान मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत, तसेच विधवा पत्नी सावित्री सावंत यांच्यावरच सध्या या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी येऊन पडली आहे.

 

 

 

 

 

 

                                  अशा परिस्थितीत या भटक्या विमुक्त समाजातील सावंत कुटुंबीयांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास प्रतिसाद देत सावली प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष व युवा सामाजिक कार्यकर्ते नितेश बनसोडे यांनी सर्वात प्रथम स्वतः पुढाकार घेत घोडेगाव येथे जाऊन सावंत कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेतली.  व त्यांना अन्नधान्य व किराणा दिला. भविष्यकाळात देखील सावली प्रकल्पाच्या वतीने सावंत कुटुंबातील मुलांना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य देण्याची तयारी दाखवली.

 

 

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राईब करा.

 

 

 

 

                              यावेळी स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ चौगुले यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल व गुलाबपुष्प देऊन नितेश बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला. बाल संगोपन केंद्रातील विद्यार्थी आनंद चौगुले, निकिता ठोंबरे, निखिल ठोंबरे, रोहिणी शिंदे, कुणाल शिंदे, रेश्मा शेगर, अर्चना शेगर, आकाश शेगर, आदी शेगर, सोनू शेगर, राजू शेगर, करण शेगर यांना प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आले.
                       कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सागर शेगर, अक्षय शिंदे, सुभाष शिंदे यांनी परिश्रम घेतले.