मनसेचे नितीन भुतारे यांच्या पुढाकाराने कोकणातील पूरग्रस्त चिपळूण या भागात ४ हजार नागरिकांसाठी मदत रवाना

मराठी बंधू भगिनिंच्या संकट काळात नगर जिल्हा मनसे पक्ष ठामपणे उभा राहिल

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून ही मदत जात आहे. मराठी बंधू भगिनिंच्या संकट काळात नगर जिल्हा मनसे पक्ष ठामपणे उभा राहिल पुराच्या संकटाचा सामना करण्यासाठी कोकणातली माणसांबरोबर आम्ही सुध्दा तयार आहोत नगर शहर व शेवगाव तालुका मनसेच्या वतीने ४ हजार नागरीकांना पाणी, तांदूळ, रग, चादर, बिस्कीट, माचिस, मेणबत्ती, फरसाण, आदी वस्तू ट्रक भरून पाठविण्यात आल्या आहेत असे नितीन भुतारे यांनी सांगितले.

 

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा.

 

 

 

 

तसेच यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, अनिता दिगे, यांनी मनोगत व्यक्त केले शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवने यांच्या मार्फत हि मदत पूरग्रस्त भागातील कोकणातील चिपळूण या ठिकाणी रवाना करण्यात आली. महाराष्ट्रातून येणाऱ्या हे सर्व नियोजन मनसेचे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांच्या मार्फत सूरु आहे.

 

 

 

 

या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, अनिता दिगे, विनोद काकडे, संकेत व्यवहारे, अशोक दातरांगे, पोपट पाथरे, संकेत होसिंग, दिपक दांगट, गणेश शिंदे, गणेश मराठे, समर्थ उकांडे ,देवीदास कुलट, तुषार हिरवे शेवगाव तालुका मनसेचे गोकुळ भागवत,संजय वणवे, गणेश डोमकावळे,देविदास हुशार,संदिप देशमुख,विठ्ठल दुधाळ,संतोष शित्रे,अमोल शेळके,ओकांर दगडे आदी उपस्थित होते.