भारतात तयार झालेल्या मोबाइलचे जगभरात निर्यात

मोबाइल उत्पादनाचे हब बनण्याच्या दिशेने भारताची सकारात्मक वाटचाल सुरू आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ६.५ अब्ज डॉलरवर भारतात उत्पादित मोबाइलची निर्यात झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४० टक्के एवढी भरघोस वाढ झाली आहे. ॲपल, सॅमसंग, शाओमी इत्यादी कंपन्यांचे भारतात मोबाइल उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे. देशात तयार झालेल्या मोबाइलची निर्यात सातत्याने वाढत आहे. मोबाइल फोनच्या एकूण निर्यातीमध्ये ॲपलचा वाटा ७० टक्के असल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे.