मोबाइल शॉपी फोडून ६६ हजारांची चोरी
अहिल्यानगर : नवनागापूर येथील सह्याद्री चौकातील ओम मोबाइल शॉपी फोडून अज्ञात चोरट्यांनी १५ डेमो मोबाइलसह ६६ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना ८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ ते १० दरम्यान घडली असून प्रकरणी १९ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव भाऊसाहेब बोराडे (वय ३६ रा. नवनागापूर) यांनी फिर्याद दिली आहे. बोराडे यांची नागापूर एमआयडीसीच्या सह्याद्री चौकात मोबाइल शॉपी असून ८ ऑक्टोबरला रात्री १० वाजता मोबाइल शॉपी बंद केली होती. त्यानंतर चोरट्यांनी शॉपीचा लोखंडी ग्रील पत्रा तोडून आत प्रवेश करून चोरी केली. दुसऱ्या दिवशी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता बोराडे हे शॉपीत आले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.