दिल्लीत पुरस्कार मिळाल्याबद्दल पै. नाना डोंगरे यांचा सत्कार
डोंगरे यांचे विविध क्षेत्रातील गावातील युवकांसह विद्यार्थ्यांना दिशा देणारे -नलिनी भुजबळ
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना दिल्ली येथील महात्मा ज्योतीबा फुले फेलोशिप नॅशनल अवॉर्ड मिळाल्याबद्दल निमगाव वाघा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
निमगाव वाघा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यध्यापिका नलिनी भुजबळ यांच्या हस्ते डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शांता नरवडे, वर्षा औटी, राणी पाटोळे, किरण सांगळे, विजय शिंदे आदी उपस्थित होते.
नलिनी भुजबळ म्हणाल्या की, सामाजिक कार्यातून नाना डोंगरे यांनी गावाचे नाव उंचावले आहे. थेट दिल्ली पर्यंत त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेण्यात आली असून, हे गावाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, कला, साहित्य व क्रीडा क्षेत्रातील योगदानाने गावातील युवकांसह विद्यार्थ्यांना दिशा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना पै. नाना डोंगरे म्हणाले की, गावाच्या सर्वांगीन विकासासाठी सामाजिक योगदान सुरु आहे. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कार्य सुरु असून, सामाजिक कार्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळत आहे. गावात झालेल्या सत्काराने भारावलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.