पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नाट्य, चित्रपट, कला, सांस्कृतिक विभागाच्या वतीने बालगंधर्व रंग मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ८७ रक्त पिशव्या संकलित झाल्या असल्याची माहिती सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली.
कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देण्यासाठी पुणे येथे नुकतेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नाट्य, चित्रपट, कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकारातून बालगंधर्व रंग मंदिर, शिवाजीनगर पुणे येथे आयोजित रक्तदान शिबिरात ८७ कलावंत व तंत्रज्ञानी रक्तदान केले.
पुणे महानगर पालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ, माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन झाले. यावेळी सांस्कृतिक विभागाचे समन्वयक संतोष साखरे, शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष भूषण सुर्वे, प्रदेश उपाध्यक्ष सिने अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके, उपस्थित होते. पुणे शहराध्यक्ष सिने अभिनेते गिरीश परदेशी, प्रदेश सरचिटणीस वंदन नगरकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रशांत गेडाम, उपस्थित होते. प्रदेश प्रसिद्धी प्रमुख अमित कुचेकर, युट्युब क्रिएटर रेखा कंगकानी, संकेत शिंदे, धनंजय वाठारकर, शशी कोठावळे, मनोज मांझीरे, अरुण गायकवाड, रोहित कांबळे, मंगेश मोरे, स्मिता मधुकर व बालगंधर्व परिवारातील सभासद यांच्यासह पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
अशा पद्धतीचे रक्तदान शिबिर महाराष्ट्रातील मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश, विदर्भ अशा सर्व विभागात व प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येणार आहेत. अशी माहिती प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्रात सध्या मोठया प्रमाणावर रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. सध्या अनेक लोक कोरोना बाधित झाले आहेत. तर अनेक जण कोरोना लस घेत आहेत. कोरोना ची लस घेतल्या नंतर एक ते दिड महिना रक्तदान करता येत नाही. त्यामुळे रक्ताचा तुटवडा अधिक भासू शकतो. हा तुटवडा भरून काढण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची रक्तदान शिबिरे घेण्यात येणार आहेत. याबाबत सांस्कृतिक विभागाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येणार आहेत.