पत्रकार उतरले रस्त्यावर कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी,रोख पैसे व धान्य असे सत्तर हजारांचा ऐवज सुपूर्द

खर्डा: येथील पत्रकार संघटनेच्या पत्रकारांनी कोरोना ग्रस्तांसाठी शहरातून मदतफेरी काढून   मदत गोळा करून जामखेड येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्पच्या डॉ.रजनीकांत आरोळे हॉस्पिटलच्या संचालिका डॉ शोभा आरोळे व सुलतान शेख यांच्याकडे मदत जमा केली.
      यावेळी पत्रकार संघाचे संतोष थोरात, दत्तराज पवार, किशोर दूशी, अनिल धोत्रे,  प्रा.धनंजय जवळेकर, गणेश जव्हेरी,खर्डा कामगार तलाठी श्रीराम कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत मदत सुपूर्द करण्यात आली.
        खर्डा शहरात कोरोना ग्रस्त रुग्णांसाठी मदतीची हाक ग्रामस्थांना दिली ग्रामस्थांनी प्रतिसाद देऊन सहकार्य केले.शहरात पत्रकारांनी एक सामाजिक उपक्रम राबवत गावातून मदतफेरी काढून मदत गोळा केली.

हे ही वाचा – मार्केट कमिटी व्यापारी असोसिएशन यांच्यावतीने जिल्हाधिकारी व आयुक्त यांना निवेदन.

      यावेळी ग्रामस्थांनी मसाला, पालेभाज्या, गहू ,ज्वारी, तांदूळ, मका, मसाले,दाळ,पोहे, गोडेतेल, आधी स्वरुपा सह रोख स्वरूपात पैसे मदत पेटीत ग्रामस्थांनी मदत केली. शहरातील लहान मुले व नागरिकांनी जन्म दिवस व  लग्नाचा वाढदिवस साजरा न करता ती मदत या पत्रकारांनी केलेल्या मदत फेरीत मदत जमा करून आपला आनंद व्यक्त केला. तसेच खर्डा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील आडत व्यापाऱ्यांनी रोख स्वरूपात सह धान्याची मदत केली. सोशल डीस्टंग शन पाळत काही नागरिकांनी फोन पे, गुगल पे, मोबाईल बँकिंग सेवा अदी मोबाईल बँकिंग सुविधा चा वापर ही करुन अर्थिक मदत मदत फेरीत जमा करून सहकार्य केले.लहान मुलेही आपल्या खाऊचे पैसे या मदत पेटीत मोठ्या उत्साहाने टाकताना दिसून आले.
      जामखेड येथील डॉ.रजनीकांत आरोळे या ग्रामीण आरोग्य प्रकल्पामध्ये तालुक्यासह शेजारील तालुक्यातील कोरोना ग्रस्त रुग्ण उपचार घेत आहेत. येथील उपचार घेणाऱ्या रुग्णांना मदत म्हणून पत्रकारांनी काढलेल्या मदत फेरीस ग्रामस्थांनी आर्थिक स्वरूपात सह अन्नधान्याची मदत सरळ हाताने केली. या मदत रॅलीमध्ये सर्व शासनाचे कोरोनाचे नियम पाळत मदत फेरी काढली. मदत फेरी चालू असतानाच पत्रकारांनी ग्रामस्थांना काही संदेश दिले. घरी रहा, सुरक्षित रहा, स्वच्छता राखा, स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या, मास्कचा वापर सॅनिटझर चा वापर करून सोशल डिस्टंसिंग पाळा असेही सामाजिक संदेश ग्रामस्थांना दिले. ग्रामस्थांनी दिलेल्या आर्थिक व अन्नधान्याची मदत खर्डा पत्रकार संघटनेने जामखेड येथे ग्रामीण आरोग्य प्रकल्पच्या डॉ. रजनीकांत आरोळे या सेंटरच्या संचालिका डॉ.शोभा आरोळे यांच्याकडे तो सर्व निधी व अन्नधान्य सुपूर्द केले.
     यावेळी खर्डा पत्रकार संघाचे संतोष थोरात, दत्तराज पवार, अनिल धोत्रे, किशोर दूशी, प्रा. धनंजय जवळेकर, गणेश जव्हेरी, खर्डा कामगार तलाठी श्रीराम कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपूर्द केला.
     पत्रकारांच्या सामजिक उपक्रमाचे कौतुक ग्रामस्थांकडून होताना दिसून आले .