“संस्था की राजकारण?” – अण्णा भाऊ साठे सोशल फोरममध्ये मोठा भूकंप!
लोणारमधून मोठी ब्रेकिंग! अण्णा भाऊ साठे महाराष्ट्र राज्य सोशल फोरम या संस्थेतील अंतर्गत राजकारणाचा स्फोट झाला आहे. फोरमचे प्रदेशाध्यक्ष साहेबराव पाटोळे यांच्यासह तब्बल १८ पदाधिकाऱ्यांनी एकत्र राजीनामा देत संघटनेत खळबळ उडवली आहे.

लोणारमधून मोठी ब्रेकिंग! अण्णा भाऊ साठे महाराष्ट्र राज्य सोशल फोरम या संस्थेतील अंतर्गत राजकारणाचा स्फोट झाला आहे.
फोरमचे प्रदेशाध्यक्ष साहेबराव पाटोळे यांच्यासह तब्बल १८ पदाधिकाऱ्यांनी एकत्र राजीनामा देत संघटनेत खळबळ उडवली आहे.
आरोप आहे की संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय अंभोरे यांनी थेट शिंदे सेनेत प्रवेश करून फोरमच्या राजकीय भूमिकेला कलाटणी दिली.
हेच कारण देत अनेकांनी “आम्ही संस्थेसोबत होतो, पक्षाशी नाही!” असा संदेश देत राजीनामे ठोकले.
राजीनामा देणाऱ्यांत सल्लागार ज्ञानदेव मानवतकर, सरचिटणीस वामनराव गुडेवार, उपाध्यक्ष भास्कर आगाम, संघटक भगवान गायकवाड, कार्याध्यक्ष गजानन सोनोने, संतोष तिरेराव, संदीप डाखोडे, कृष्णा नाटेकर यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे हे सगळं अण्णा भाऊ साठेंच्या पुण्यतिथीच्या दिवशीच घडलं, ज्यामुळे चर्चेला जोर चढला आहे.
“चांगल्या संस्थांना राजकीय भांडणं खचवतात. फोरमही त्याच वाटेवर जाऊ लागला…” अशा भावना सदस्यांमधून व्यक्त होत आहेत.
सोशल मीडियावर यावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत. “राजकारण बाजूला ठेवा, अण्णा भाऊंची शिकवण पुढे न्या!” अशी मागणी नेटिझन्स करत आहेत.
संस्था की सत्ता? विचार की विकास? – हा सवाल आता पुढे किती संस्था गारद करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.