ओबीसी ,व्हीजे, एनटी ,यांच्या वतीने नगरमध्ये जिल्हामेळावा संपन्न

नामदार विजय वडेट्टीवार यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती

अहमदनगर : 

 

डॉक्टर बाबाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले घटनात्मक अधीकार मिळवण्यासाठी आणि आपलं आरक्षण वाचवण्यासाठी आज ओबीसी ,व्हीजे, एनटी , यांच्या वतीने जिल्हामेळावा आज नगरमध्ये आयोजित करण्यात आला होता.  यावेळी बहुजन विकासमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती तसेच प्रताप काका ढाकणे आणि ओबीसी नेते बाळासाहेब  हे देखील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. 
टिळक रोडवरील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात हा मेळावा आयोजित करण्यात  आला होता, यावेळी आलेल्या सर्व नामदार व्यक्तींचे कार्यालयात वाजत गाजत स्वागत करण्यात आलं, पिवळ्या रंगाच्या टोप्या आणि पंचा परिधान केल्यामुळे सगळं वातावरण यावेळी ओबीसीमय झालं होते.  यावेळी कुणाच्या पोटी कोण जन्माला  येईल हे आपल्या हातात नाही, मात्र जन्माला आल्यावर जन्माचे सार्थक करायचे हे आपल्याच  हातात आहे आणि हेच ओबीसीने सिद्ध केलं असल्याची भावना माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी व्यक्त केली.  प्रसंगी आनंद लहामगे यांनी हि ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवण्याची  मागणी वडेट्टीवार यांच्याकडे केलीय.  यावेळी नामदार विजय वड्डेट्टीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. 
या  मेळाव्याला बाळासाहेब भुजबळ, राजेंद्र पडोले, संजय खामकर, चंद्रकांत फुलारी, शौकत तांबोळी,बाबासाहेब सानप, बाळासाहेब बोराटे,हरिभाऊ डोळसे, रमेश सानप, विशाल वालकर , अशोक सोनवणे,  दत्ता  जाधव, अनिल निकम ,सुनील भिंगारे, जितेंद्र वल्लाकट्टी, अशोक दहिफळे, अमोल भांबरकर ,शशिकांत पवार, रमेश बिडवे, राजेश सटाणकर, श्रीकांत मांढरे, बंटी ढपसे, संजय  आव्हाड, कैलास गर्जे, अनिल इवळे   यांसह अनेकजण यावेळी उपस्थित होते.