उपसभापती रविंद्र भापकर यांच्या वतीने गुंडेगावला बाकडे भेट…

आकर्षण बाकड्यामुळे शाळेचा परिसराच्या सौंदर्यात भर

अहमदनगर तालुका प्रतिनिधी (संस्कृती रासने )

 

नगर तालुका पंचायत समिती उपसभापती श्री.रविंद्र भापकर यांच्या स्थानिक विकास निधीतून गुंडेगाव येथे न्यू इंग्लिश स्कूल शाळेला तसेच विविध ठिकाणी बाकडे देण्यात आले.या आकर्षण बाकड्यामुळे शाळेचा परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे.

 

 

त्याचप्रमाणे गावातील मुख्य रस्त्यावरील आगळे वस्तीवर, गावठाणातील चौकात हे बाकडे बसविण्यात आले आहेत,यावेळी रविंद्र भापकर बोलताना म्हणाले की पंचायत समिती स्थानिक विकास निधीतून गुंडेगाव गणात प्राथमिक शाळाखोल्या बांधणे,पेव्हर ब्लॉक बसवणे, स्मशानभूमी सेड बांधणे,गावांतर्गत सिमेंट रस्ता करणे, हाय-मॅक्स (पथदिवे) बसवणे, अंगणवाडी शाळा खोल्या उभारणे,सिमेंट बाकडे बसवणे, वृक्ष लागवड करणे, असे विविध प्रकारचे विकास कामे केली आहेत.तसेच भविष्यात लोकप्रतिनिधींनी आपला विकास निधी हा अशा ठिकाणी खर्च केला पाहीजेत की ज्या ठिकाणी त्याचा योग्य उपयोग हा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठीच झाला पाहिजे परंतु तसे घडताना दिसत नाही,आज शाळेत बाकडे बसवल्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनींना याचा अभ्यासासाठी उपयोग होणार आहे.तसेच इतरांना ही त्याचा उपयोग होणार आहे.हा मनाला समाधान देणारा क्षण आहे.

 

 

 

आपण पहातो बऱ्याच ठिकाणी विकास कामे होतात निधीही खर्च केला जातो परंतु तो जनसामान्यांच्या कोणत्याच उपयोगी पडत नाही. मग नाहक शासनाचा हा विकास निधी वाया जातो.परंतु आज खऱ्या अर्थाने गुंडेगाव येथे बाकडे देताना या बाकड्यांचा उपयोग चांगल्या ठिकाणी होत आहे हे पाहून मनाला समाधान वाटत आहे.
असे प्रतिपादन रविंद्र भापकर यांनी केले आहे यावेळी गुंडेगाव न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका श्रीमती नेहूल प्रयागा यांनी त्यांचे आभार मानले. उपस्थितांमध्ये शाळेचे श्री परशुराम साबळे सर ,श्री.अनिल कोतकर,श्री.लोखंडे मामा,डाॅ.विलास सकट,श्रीमती सुरेखा जाधव,श्रीमती प्रिया खडके,श्री.दादासाहेब आगळे इ. उपस्थित होते…..