महाराष्ट्र रायफल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र एअर अ‍ॅण्ड फायरआर्म राज्यस्तरीय शुटिंग स्पर्धेचे उद्घाटन

खेळाडूंना सोयी-सुविधा निर्माण करण्याची पायाभरणी शहरात सुरु -आमदार संग्राम जगताप

अहमदनगर (संस्कृती रासने) 

 

कोरोना काळात अनेक क्रीडा स्पर्धा न झाल्याने खेळाडूंचे मोठे नुकसान झाले. खेळात सराव महत्त्वाचा असून, कोरोना काळात खेळाडूंना सरावही करता आला नाही. स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू पुढे येतात. अशा स्पर्धेतून खेळाडूंना चालना व प्रोत्साहन मिळते, यासाठी स्पर्धेची आवश्यकता आहे. शहराचा विस्तार वाढत असताना उपनगर देखील झपाट्याने वाढत आहे. उपनगर भागातील खेळाडूंची सोय होण्यासाठी क्रीडांगण निर्माण करण्याचे कार्य सुरु केले आहे. याचा पहिला टप्पा म्हणून सावेडी येथे बॉस्केटबॉलचे मैदान सज्ज करण्यात आल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. आपल्या मातीतला खेळाडू ऑलंम्पिकमध्ये चमकण्यासाठी खेळाडूंना सोयी-सुविधा निर्माण करण्याची पायाभरणी शहरात सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर काही खेळ खर्चिक असल्याने त्यामधील गुणवंत व गरजू खेळाडूंच्या पाठिशी उभे राहण्याचे आश्‍वासन देखील त्यांनी दिले.

 

वाडियापार्क क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र रायफल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र एअर अ‍ॅण्ड फायरआर्म राज्यस्तरीय शुटिंग स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी डॉ. मरियम माजिद, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, अहमदनगर शूटिंग क्लबचे अध्यक्ष तथा उपरसपंच भारत काळे, उपाध्यक्षा सुनिता काळे, शशिकांत पाचारणे, सोसायटी चेअरमन सतीश काळे, क्रीडा अधिकारी दिपाली बोडखे, सहसचिव प्रविण लिपणे, न्यायधीश प्रविण चुत्तर, एमआरए पंच विराज सेलेटकर, पंच छबुराव काळे, राष्ट्रवादी क्रीडा सेलचे घनश्याम सानप, सायकलिंग असोसिएशनचे संजय साठे, प्रशांत बागडे, सुशीलकुमार नागपुरे, संजय पाटेकर, राजश्री पाटील, फटांगरे, विठ्ठलप्रसाद तिवारी, संजय आगरकर आदिंसह खेळाडू व पालक उपस्थित होते.

 

 

पुढे आमदार जगताप म्हणाले की, एअर रायफल शुटिंग हा खेळ सध्या लोकप्रिय होत आहे. पूर्वीपासून हा खेळ असतित्वात होता, मात्र या खेळाची आधुनिक साधनसामग्री व शूटिंग रेंज उपलब्ध नसल्याने खेळाडूंना मोठ्या शहरात जावे लागत होते. मात्र सध्या शहरात या खेळाची व्यवस्था झाल्याने अनेक खेळाडू पुढे येऊन नॅशनल स्पर्धेपर्यंत मजल मारत आहे. नेमबाजी करताना खेळाडूची मानसिक एकाग्रता देखील वाढीस लागते. मागील ऑलंम्पिक मध्ये या खेळात भारताला का खेळात करिअर घडविण्यासाठी विविध खेळातील अनेक खेळाडू पुढे येत आहे. काही नवीन खेळांचा समावेश करुन त्यामधील राष्ट्रीय खेळाडूंना सरकारी नोकरीत प्राधान्य मिळण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजीत पवार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता.

 

मात्र कोरोनाची परिस्थिती निर्माण झाल्याने हा प्रश्‍न प्रलंबीत राहिला. त्याचा पाठपुरावा पुन्हा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रास्ताविकात भारत काळे यांनी शहरात पहिल्यांदाच राज्यस्तरीय शुटिंग स्पर्धा होत असून, या क्रीडा प्रकारात शहरासह ग्रामीण भागातील खेळाडू पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. मरियम माजिद यांनी उपस्थित खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे यांनी शासनाने खेळांना प्राधान्य देऊन खेळाडूंना करिअर करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. अनेक खेळाडू व पालक करिअरच्या दृष्टीने त्याकडे पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

जिल्हा क्रीडा कार्यालयातील अहमदनगर जिल्हा रायफल अ‍ॅण्ड पिस्तोल स्पोर्टस शूटिंग क्लबमध्ये या स्पर्धा पार पडल्या. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील खेळाडूंनी उत्सफुर्त सहभाग नोंदवला. खेळाडूंनी नेमबाजीचे कौशल्य पणाला लावत निशाणा साधला. फायरिंगच्या आवाजाने क्लबचे हॉल निनादले. कोरोना नियमांचे पालन करुन शुटिंग हॉलमध्ये पंच व निवडक खेळाडूंनाच प्रवेश देण्यात आला होता. यावेळी अभिजीत दळवी, धनंजय कारंडे, संजय आगरकर, कृष्णा काळे, भारत पवार, नितीन बोधले, राहुल कदम, अलीम शेख, ऋषीकेश दरंदले आदी उपस्थित होते. वीणा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आभार छबुराव काळे यांनी मानले.