नाशिक : अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टीवरून जमिनीकडे सरकत आहे. त्याचवेळी बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्रदेखील विस्तारल्यामुळे नाशिक छत्रपती संभाजी नगरसह राज्याच्या बहुतांश जिल्हांमध्ये आगामी 72 तासात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणात अति जोरदार, पुणे साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि काही ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी शक्य असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.