पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने, क्रांति दिनानिमित्त राष्ट्रीय अनागोंदी जारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय अनागोंदीचे महामेरू असल्याचे घोषित

अहमदनगर (प्रतीक शिंदे)

क्रांति दिनानिमित्त पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने राष्ट्रीय अनागोंदी जारी करण्यात आली आहे. तर वेबीनारवर कार्यकर्त्यांची बैठक होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय अनागोंदीचे महामेरू घोषित करण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

 

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 

 

राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन्ही गुजरात मधून आले. महात्मा गांधी यांनी देशातील जनतेसाठी अंगावर फक्त पंचा ठेवून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वत:चे जीवन देश स्वातंत्र्यासाठी लावले. 1942 च्या आझाद मैदान येथे चले जाव ची घोषणा त्यांनी क्रांतिदिनी केली. इंग्रजी राजवट उलथून लावली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर येऊन सात वर्षे झाली. या सात वर्षात फक्त घोषणा पाऊस पाडून जाहिरातबाजी करण्यापलीकडे काही काम करण्यात आले नाही. सर्वसामान्यांची प्रश्‍ने अधिक गंभार बनली आहे. महागाईने सर्वसामान्यांना जगणे अवघड झाले आहे. घरकुल वंचितांना हक्काचा निवारा मिळण्याचे स्वप्न देखील धूसर आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाळे देशात राष्ट्रीय अनागोंदी माजली असल्याचा आरोप संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे.

 

 

 

 

भाजप सत्तेवर येतानाच्या दिवसापेक्षाही वाईट दिवस सध्या आले आहेत. याला कारणीभूत केंद्र सरकारचे चुकीचे धोरण, व भ्रष्टाचाराने बरबटलेली नोकरशाही आहे. सरकारी कामाचा दर्जा नाही. टोलवाटोलवीने सर्वसामान्यांचे कामे होत नसल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या वर्चुअल बैठकित कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, अ‍ॅड. गवळी, प्रकाश थोरात, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका नागुल, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदींनी सहभाग नोंदवला. उपस्थितांनी मोदी प्रणित भाजप सरकाच्या अनेक चुकीच्या धोरणांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.