मानव अधिकार संघाच्या जागृकतेने वंचित घटकांना न्याय मिळण्यास मदत होणार -आ. संग्राम जगताप

बोल्हेगाव येथे आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

नागरिकांचे न्याय हक्क अबाधित ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघ कार्य करत आहे.  मानव अधिकार संघाच्या जागृकतेने वंचित घटकांना न्याय मिळण्यास मदत होणार आहे. कोरोनाच्या संकटकाळात अनेक गरजू घटकांना मदत करण्याचे काम मानव अधिकारने केले. लोकहितासाठी चालविण्यात आलेल्या मानव अधिकार चळवळीने वंचित व दुर्बल घटकांना आधार मिळणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

 

 

 

 

बोल्हेगाव येथे आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी फित कापून व दीपप्रज्वलन करण्यात आले. तर भारतीय संविधानाचे पूजन करुन कार्यालयाच्या कामाची सुरुवात झाली. यावेळी नगरसेवक कुमारसिंह वाकळे, आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाचे राज्य अध्यक्ष  बाळासाहेब सणस, राज्य कार्याध्यक्ष रवीराज साबळे, पुणेचे व्हाईस चेअरमन विकास दंडवते, नगरसेवक अ‍ॅड. राजेश कातोरे, डॉ. सागर बोरुडे, मुख्याध्यापक पॉल भिंगारदिवे, एसबीआयचे गंगाराम झावरे, डॉ. सचिन दरंदले, खांडके सरपंच पोपट चमटे, पिंपळगार सरपंच राहूल आल्हाट, डॉ. शंकर दातीर, महादेव कापडे, राजेंद्र लोखंडे, राधाकिसन महापूरे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 

कुमारसिंह वाकळे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या दक्षतेने अन्यायाला वाचा फुटणार असून, सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी नागरिकांनी आपल्या न्याय, हक्का संदर्भात जागृक राहण्याचे आवाहन केले व संघाच्या वतीने कोरोनाच्या संकटकाळात करण्यात आलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.राज्य अध्यक्ष बाळासाहेब सणस म्हणाले की, अत्याचार सहन करण्यापेक्षा त्या विरोधात आवाज उठविला पाहिजे. न्याय हक्कासाठी लढल्यावर निश्‍चित न्याय मिळतो. अन्याया विरोधात लढा देण्यासाठी व सर्वसामान्यांच्या पाठिशी उभे राहण्याकरिता आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघ सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा चेअरमन प्रा. पंकज लोखंडे यांनी प्रास्ताविकात भारत सरकार संलग्न असलेल्या आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या माध्यमातून संपुर्ण देशात नागरिक, महिला, कामगार वर्ग, व्यावसायिक व लहान मुलांच्या न्याय, हक्कासाठी कार्य सुरु आहे. पिडीतांना त्यांचे हक्काची जाणीव करुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबध्द आहे. या प्रमुख उद्देशाने संघाचे कार्य सुरु आहे.

 

 

 

 

या संपर्क कार्यालयातून सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यात येणार असल्याचे सांगितले. राज्य कार्याध्यक्ष रवीराज साबळे यांनी पोलीस यंत्रणा व शासकीय पातळीवर राजकीय दबाव आल्याने पिडीतांना न्याय मिळण्यास अडथळा निर्माण होत आहे. अशा घटनांना वाचा फोडून आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघ पिडीतांना न्याय देण्याचे कार्य करणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी शरद महापुरे, संदीप कापडे, संदीप ठोंबे, अनिल गायकवाड, संतोष वाघ, रमेश आल्हाट, नितीन साठे, मोहित निकाळे, महेश गोरे, तुषार शिंदे, दशरथ कापडे, प्रशांत लोखंडे, निखील देठे, इरफान पठाण, ऋषी थोरात, ओंकार पाटसकर, चेतन शेवाळे,  काभू साठे, सारंग कराळे, विजय दुबे , अण्णा धोत्रे , अमित लोखंडे आदी उपस्थित होते.