प्रभासचे चाहत्यांसाठी पोंगल गिफ्ट!
मागील बऱ्याच दिवसांपासून प्रभासचा ‘द राजासाब’ हा चित्रपट चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले होते. आता मकरसंक्रांत आणि पोंगलच्या मुहूर्तावर ‘राजासाब’मधील प्रभासचा फ्रेश लूक रिव्हील करण्यात आला. प्रभासच्या चाहत्यांसाठी पोंगलच्या गिफ्टरूपात रिलीज करण्यात आलेल्या नवीन पोस्टरवर डोळ्यांना गॉगल लावलेला ‘राजासाब’चा हसरा चेहरा आहे. १५ मे रोजी प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या ‘राजासाब’च्या प्रदर्शनाची तारीख पोस्टरवर घोषित केलेली नाही. रोमँटिक हॉरर-कॉमेडी या चित्रपटाचे दिग्दर्शन मारुती यांनी केले आहे. यात प्रभासने भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी राजा ठाकूर ऊर्फ राजासाब आणि देवा या दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. यात त्याच्यासोबत मालविका मोहनन आणि निधी अगरवाल या अभिनेत्री असून, संजय दत्त, अनुपम खेर, झरिना वहाब, मुरली शर्मा आदी कलाकारही आहेत.
‘कल्की २८९८ एडी’ : या चित्रपटानंतर प्रभाससाठी ‘राजासाब’ हा महत्त्वाचा चित्रपट आहे. ह्रा मूळ तेलुगू भाषेतील चित्रपट हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.