थंडी वाढल्याने मच्छीमारांना मासेमारी करण्यास अडचण
राज्यात थंडी वाढल्यामुळे मासेमारी व्यवसाय अडचणीत सापडल्याचे सध्या चित्र आहे. पुण्यातील उजणी धरण थंडीने गारठल्याने मच्छीमारांना मासेमारी करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे माशांचे भावही वाढले आहेत. उजनी धरणात पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.
थंडीमुळे या पाण्याचा गारठा वाढला आहे. या दोन्ही कारणांमुळे मासे वास्तव्यासाठी पाण्याच्या खोलवर जातात आहेत. परिणामी मच्छीमारांच्या जाळ्यात मासे सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात आणखी भर म्हणून या धरणात माशांचे बीजदेखील टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे मासेमारी करणे कठीण होऊन बसले आहे. परिणामी मासळी बाजारात माशांची आवक कमी झाली आहे. आवकच घटल्याने माशांच्या दरात वाढ झाली आहे.
पूर्वीचे भाव सध्याचे भाव
चिलापी 60 ते 70 रु 100 ते 120 रु
वाम्ब 300 ते 350 रु 400 ते 450 रु
मृगळ 250 रु 350 रु
कटला 100 ते 120 रु 150 ते 160 रु
शिंगाड़ा 150 रु 220 रु
खेकड़ा 100रु 150 रु
गुगळी 180 ते 200 रु 250 ते 260 रु
रव 100 ते 120 150 ते 160 रु