गुंडेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा 

अहमदनगर : 

ज्या महामानवाने हजारो वर्ष वंचित,शोषित,निराधार,गावकोसाबाहेर गावगाड्यापासून दूर असलेल्या समाजाच्या वेदना स्व:ता भोगल्या आणि आपल्या समाजाचा स्वाभीमान जागृत करुण स्पृश्य, अस्पृश्य यातील दरी नष्ट करून समता प्रस्थापित केली, मागास समाजाच्या वेदनांनी गोलमेज परिषदा गाजवल्या होत्या.

गोरगरिब ,विकासापासून कोसो दूर असलेल्या समाजाला राजकीय आरक्षण, शिक्षण ,नोकरी व पदोन्नोतीमध्ये आरक्षणाची संविधानातच तरतुद केली.  महिलांच्या हक्कासाठी हिंदू कोड बिल संसदेत मांडले.  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केली.  भाक्रा नांगल हिराकूड धरणाचे प्रकल्प राबविले.   किड्या – मुंगीचे जीवन जगण्यापेक्षा, आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना रुजवन्याचा संदेश त्यांनी दिलाय.


अशा महामानव विश्वरत्न परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना जेष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी,जावळे गुरुजी, दादासाहेब आगळे,संजय भापकर, माऊली कुताळ, दादा जावळे, डॉ.विलास सकट,भाऊसाहेब शिंदे, अरुण जावळे, अनिल सकट, विकास शिर्के, इ.नागरीक उपस्थित होते.