सांगलीला जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य अधिवेशनाचे आयोजन

जिल्ह्यातील सर्व महिला पदाधिकारी व सदस्यांनी सहभागी व्हावे -अनिता काळे

नगर (प्रतिनिधी)- मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडचे राज्य अधिवेशन शनिवार (दि.30 नोव्हेंबर) व रविवार (दि. 1 डिसेंबर) सांगली येथे होत आहे. या अधिवेशनासाठी जिल्ह्यातील सर्व महिला पदाधिकारी व सदस्यांनी सहभागी होण्याचे आवाहन मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे पाटील यांनी केले आहे.
वैचारिक संघटन असलेल्या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी जिजाऊ ब्रिगेड संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. महिलांचे सक्षमीकरण व प्रबोधन हे उद्दीष्ट समोर ठेऊन जिजाऊ ब्रिगेडचे कार्य सुरु आहे. वैचारिक चर्चा व प्रबोधन करण्यासाठी आज पर्यंत संघटनेने महाराष्ट्रात विविध ठिकाणी अधिवेशन आयोजित केली आहे. सांगली येथे होणाऱ्या अधिवेशनामध्ये सांस्कृतिक, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, राजकीय, बौद्धिक विचारांची देवाणघेवाण होणार आहे. या अधिवेशनासाठी उपस्थित राहण्याचे म्हंटले आहे.