शहरात शिवसेनेच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा

स्व. बाळासाहेबांचे विचार व कार्य पुढे घेऊन जाण्याचा संकल्प

शिवसैनिकांनी स्व. बाळासाहेबांचा स्मृती दिवस विचारांची प्रेरणा घेण्यासाठी साजरा करावा -सचिन जाधव

नगर (प्रतिनिधी)- शहरात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने अभिवादन करण्यात आले. मंगलगेट येथील शिवसेनेच्या शहर संपर्क कार्यालयात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. समाजाच्या कल्याणासाठी स्व. बाळासाहेबांचे विचार व कार्य पुढे घेऊन जाण्याचा संकल्प उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.
अभिवादनासाठी शिवसेनेचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले, शहर प्रमुख सचिन जाधव, उपनगर प्रमुख काका शेळके, भिंगार शहर प्रमुख सुनील लाल बोंद्रे, भिंगारचे माजी नगरसेवक संजय छजलाने, रवी लालबोंद्रे, युवा सेनेचे अमोल हुंबे, वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख ओमकार शिंदे, महिला शहर प्रमुख ॲड. पुष्पाताई येळवंडे, उपशहर प्रमुख तृप्ती साळवे, शहर संघटक सलोनी शिंदे, उपशहर प्रमुख मयूर गायकवाड, प्रवक्ते विशाल शितोळे, समीर गवळी, सतीश काळे, घनश्‍याम सापते, संजय उदारे, विजय जाधव, शेखर तांदळे, परेश खराडे, नंदू बेद्रे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहर प्रमुख सचिन जाधव म्हणाले की, आपल्या कार्याने व विचाराने स्व. बाळासाहेब ठाकरे जनसामान्यांचे हिंदूहृदय सम्राट बनले. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेण्यासाठी शिवसैनिकांनी बाळासाहेबांचा स्मृती दिवस साजरा करावा. त्यांचे ज्वाजल्य हिंदूत्वाचे विचार प्रत्येक कार्यकर्त्याला स्फुर्ती देणारे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जात आहे. त्यांच्या विचारातून कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले म्हणाले की, देशाला हिंदुत्वाचे विचार त्यांनी दिले. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. राजकारणापेक्षा समाजकारणाला त्यांनी महत्त्व दिले. सर्वसामान्यांच्या हातात सत्तेची चावी दिली. घराणेशाही मोडीत काढून त्यांनी सर्वसामान्यांना आमदार, खासदार पदापर्यंत नेले. आज त्यांच्या कार्याची व विचारांची समाजाला गरज असल्याचे त्यांनी सांगितले.