‘ग्रो मोअर’ घोटाळ्यात धक्कादायक खुलासा!

 1.5 कोटींची ऑनलाईन खंडणी घेतली आणि चार पोलीस झाले निलंबित!

🚨
 ‘ग्रो मोअर’ घोटाळ्यात धक्कादायक खुलासा!
📍 1.5 कोटींची ऑनलाईन खंडणी घेतली आणि चार पोलीस झाले निलंबित!

शिर्डीच्या ‘ग्रो मोअर’ कंपनीच्या फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी 4 पोलिसांनी आरोपीकडून तब्बल ₹1.5 कोटी ऑनलाईन घेतल्याचा सनसनीखेज प्रकार उघड झाला आहे.
या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कडक पाऊल उचलून
👉 PSI तुषार धाकराव
👉 मनोहर गोसावी
👉 बापूसाहेब फोलाणे
👉 गणेश भिगारदे
या चौघांना तात्काळ निलंबित केलं!


💰 आरोपी भूपेंद्र सावळे याने चौकशीत सांगितलं की,
15 जानेवारी रोजी त्याला पोलिसांनी लोणीजवळ अडवलं.
📲 “आरबीआय परवाना नसताना पैसे उभे केलेस, आता गुन्हा लागणार!”
अशी धमकी देत दीड कोटींची मागणी केली.

🚗 त्याला थेट अहमदनगर SP ऑफिसच्या पार्किंगमध्ये नेऊन ऑनलाईन ट्रान्सफरसाठी दबाव टाकण्यात आला आणि अखेर ₹1.5 कोटी ट्रान्सफर करावे लागले!


🕵️‍♂️ प्राथमिक चौकशीत सत्यता आढळून आल्यानंतर चौघांना निलंबित करण्यात आलं.
👉 डॉ. शरद गोर्डे यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे.

📉 ‘ग्रो मोअर’ घोटाळा अंदाजे ₹500 कोटींचा असून 3,000+ गुंतवणूकदार फसले आहेत!
🏛️ हे प्रकरण विधानसभेत गाजले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले.

📢 पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे वक्तव्य –
“कोणीही दोषी असतील, त्यांनी कितीही मोठी व्यक्ती असली तरी त्यांच्यावर कारवाई होणारच!”


 

🔥 “सिस्टमवरचा विश्वास डळमळीत करणारी ही घटना – आता जनतेला न्याय मिळतो का, याकडे राज्याचं लक्ष!”