अहमदनगर सिटी रायफल अॅण्ड पिस्तोल शूटिंग क्लब मधील नगरच्या सहा खेळाडूंची राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेकरीता निवड
पश्चिम राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत केली उत्कृष्ट कामगिरी
प्रतिनिधी (वैष्णवी घोडके)
अहमदनगर सिटी रायफल अॅण्ड पिस्तोल शूटिंग क्लबच्या सहा खेळाडूची राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झाली आहे. अहमदाबाद (गुजरात) येथे झालेल्या आठवी पश्चिम राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत क्लबच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन आपल्या नेमबाजीचा ठसा उमटवला. या स्पर्धेत शहरातील खेळाडू देवेश चतुर, हर्षवर्धन पाचारणे, वेदांत गोसावी, वीणा पाटील, रोशनी शेख-बागडे, राजश्री फटांगडे या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अहमदाबाद येथे झालेल्या पश्चिम राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत गोवा, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, दीव-दमण या राज्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये शहरातील अकरा खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहेत.
यशस्वी खेळाडूंना अहमदनगर सिटी रायफल अॅण्ड पिस्तूल शूटिंगच्या उपाध्यक्षा सुनिता काळे, सहसचिव प्रविण लिपण, प्रशिक्षक ऋषिकेश दरंदले, अलीम शेख यांचे मार्गदर्शन लाभत आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचे आमदार संग्राम जगताप, शशिकांत पाचारणे, संजय पाटेकर, घनश्याम सानप, आनंद लहामगे, प्रवीण चतुर, नितीन वाघमारे, संजय साठे, प्रशांत बागडे, सुशीलकुमार नागपुरे, दिपाली बोडके, प्राचार्या सुनिता भिंगारदिवे, मंजू बागडे आदिंसह सर्व पालका व खेळाडूंनी त्यांचे अभिनंदन केले.