अहमदनगर (वैष्णवी घोडके)
संगमनेर शहर हद्दीत सावतामाळी नगर येथिल पोलिस लाईन शेजारी घारगाव येथील हेरिटेज वाईन्स शॉप संगमनेर येथे वरील नमूद केलेल्या ठिकाणी स्थलांतरासाठी परवानगी रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कन्हैयालाल कतारी (राजपूत) त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क व जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शन करून जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले यावेळी संगमनेर शिवसेना शहर प्रमुख अमर कन्हैयालाल कतारी (राजपूत) समवेत सुनीता मंडलीक, कल्पना राठोड, पूजा खिच्ची, संगीता खिच्ची, अमर मंडलीक, प्रकाश चोथवे, अमर कतारी, सुभाष भरीतकर, दत्तू कांडेकर, सनील कतारी, अमर मंडलिक, अनिल केंद्रे आदी सह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

संबंधित ठिकाणी पोलीस लाईन वसाहत असून व रहिवासी प्रभाग आहे स्थलांतरित होणाऱ्या वाईन्स शॉप च्या पाठीमागच्या बाजूला एक विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर आहे तेथे मोठ्या प्रमाणात भक्ताची वर्दळ असते संबंधित ठिकाणी जवळच शाळा व कॉलेज आहे संबंधित प्रभागातल्या नागरिक व महिला हे सक्षम मला भेटून स्थलांतर होणाऱ्या वाईन शॉप बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली व संबंधित जनमताचा विचार करता व माझ्याकडे असणाऱ्या ग्रामीण जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य दारू बंदी समिती पदावर असले कारणाने सदर विषय संदर्भात दखल घेऊन स्थलांतराचा प्रस्ताव त्वरित रद्द करण्याची मागणी करण्यात आली व सदर वाईन शॉपला परवानगी दिल्यास शिवसेना व कृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.