तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले गंभीर आरोप…..!!!!!!! ज्योती देवरे हाजीर हो !!!

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ज्योती देवरे दाखल. चौकशी...... निःपक्षपातीपणे करा अशी मागणी.....

 

ऋषिकेश राऊत 

अहमदनगर

पारनेरच्या वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे या अखेर जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झाल्या आहेत. त्यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिलेला अहवालात त्यांच्यावर दोषारोप करण्यात आलेले आहेत. त्यांच्या बद्दल व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप ची आणि त्यांना त्रास देणाऱ्या लोकप्रतिनिधींची सखोल निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केलीय. या मागणीचे निवेदन त्यांनी ज्या संघटनेद्वारे केली  त्या  संघटनेच्या  जिल्हाध्यक्ष आहेत, अशा राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेचा त्यांनी आधार घेतलाय.

 

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी वृत्तवाहिन्यांशी संवाद साधला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मला हाकलून दिले, अशा खोट्या बातम्या प्रसारमाध्यमांद्वारे छापून आणल्या असा आरोप त्यांनी केलाय. देवरे यांची जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या त्रिस्तरीय समितीसमोर चौकशी होणार आहे. त्याची सुनावणी सोमवारपासून सुरु झालीय. त्यांचा वाहनचालक , आबा औटी यांनी आपणावर ज्योती देवरे यांच्या विरोधात तक्रार देण्याविषयी दबाव आणला जात होता. पण माझी कोणत्याही प्रकारची तक्रार नव्हती आणि नाही . मला ऍड. राहुल झावरे आणि डॉ. बाळासाहेब कावरे यांनी वारंवार फोन करून दबाव टाकला. पण त्याला मी बळी पडलो नाही असे स्पष्टीकरण औटी यांनी दिले.

 

 

 

 

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे आज कॅमेऱ्यासमोर आल्या व त्यांनी विविध बाबींवर प्रकाश टाकला. व्हायरल क्लिपबाबतचं सत्य सांगतानाच अण्णा हजारे यांच्या भेटीनंतर चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याबद्दलही त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. पारनेर च्या महिला तहसील देवरे पुढे म्हणाल्या, ‘जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ती माझीच आहे, पण ती मी व्हायरल केलेली नाही. माझ्या भावाने एका पत्रकार मित्राला दिली आणि मग व्हायरल झाली. क्लिप व्हायरल झाल्यावर अनेकांनी मला धीर दिला आणि मी त्यातून आता सावरले आहे.

 

 

 

 

वेळ आल्यावर आपलीही विचारशक्ती संपते, याचा मी अनुभव घेतला. माझ्या विरुद्ध पाठविलेल्या अहवालात अनेक तांत्रिक चुका आहेत. चौकशी अहवालाला घाबरून मी हे काहीच केलेले नाही. पण माझ्यावर जो दबाव आणला जात होतो, जी भीती दाखविली जात होती त्यातून मी नकारात्मक विचार केला. आता त्यातून मी बाहेर पडले पण त्रास थांबलेला नाही. विरोधकांना अद्यापही पाझर फुटलेला दिसत नाही’, असे सांगताना मी कोणाची नावं घेतली नाही, घेणारही नाही. त्यांनी स्वतःच समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे, असे सूचक विधानही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता ज्योती देवरे यांनी केले