काँग्रेस पक्ष सर्वसामान्य घटकाच्या पाठीशी

तर काँग्रेस सामान्यांच्या पाठीशी - आमदार सुधीर तांबे

 नगर : केंद्रातील भाजप सरकार हे या देशातील म मुठभर भांडवलदारांच्या पाठीशी आहे.  तर काँग्रेस पक्ष हा समाजातील सर्वसामान्य घटकांच्या पाठीशी आहे.  कामगार विरोधी कायद्याच्या माध्यमातून कामगारांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष करत आहे,  असे प्रतिपादन काँग्रेसचे आ.डॉ.सुधीर तांबे यांनी केले आहे.
अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या संघटनात्मक आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे होते. माजी महापौर दिप चव्हाण, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दानिश शेख, सेवादल विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे आदी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
आ. तांबे म्हणाले की नगर शहरालगत असणाऱ्या एमआयडीसी मधील कामगारांच्या स्वाक्षरी गोळा करण्याच्या मोहिमेला शहर काँग्रेसने चांगला वेग दिला आहे. या माध्यमातून कामगारांना नोकरी बाबतची सुरक्षितता कायम राहावी यासाठी केंद्राच्या काळ्या कामगार कायद्याला विरोध करत काँग्रेसने पुढाकार घेतला आहे.
यावेळी मनोज गुंदेचा, खलील सय्यद, विशाल कळमकर, रियाज शेख, नलिनीताई गायकवाड, प्रमोद अबुज, अनिस चुडीवाल, अमित भांडण, शानूभाई शेख, प्रवीण गीते, चिरंजीव गाढवे, देवेंद्र कडू, इम्रान बागवान, अक्षय कुलट, संदीप पुंड, विवेक केकान, प्रशांत वाघ, प्रशांत जाधव, ॲड.अजित वाडेकर, ॲड.सुरेश सोरटे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महसूलमंत्री ना. थोरात ,काळे यांच्या पाठीशी 

———————-
यावेळी बैठकीत कार्यकर्त्यांनी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यावर महाविकास आघाडीतीलच मित्र पक्षाच्या नेत्याच्या वतीने खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस यंत्रणेवर दबाव आणल्या बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.  यावर कार्यकर्त्यांची समजूत घालताना आ. सुधीर तांबे म्हणाले की, किरण काळे हे शहर काँग्रेसचे अत्यंत चांगल्या पद्धतीने नेतृत्व करत आहेत. काँग्रेसने शहरात कात टाकली आहे. काळे यांच्या रूपाने पक्षाने शहराला दूरदृष्टी असणारे सुसंस्कृत नेतृत्व दिले आहे. ते संघर्षवादी, निर्भिड नेते आहेत. सगळ्या अडचणींना ते पुरून उरतील, याचा पक्षाला विश्वास आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांची आणि काँग्रेस पक्षाची संपूर्ण ताकद काळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अजिबात चिंता करू नये. पक्षाचे संघटन जोरदार पद्धतीने शहरात उभे करावे, असे आवाहन आ. तांबे यांनी यावेळी केले.
https://youtu.be/Wa-6TAbskOk