अंधांची “स्वर दीपावली” संगीत मैफिल आणणार दिवाळीला रंगत
येत्या रविवारी माऊली सभागृहात स्वर दीपावलीचे आयोजन ; रसिक नगरकर यांना उपस्थितीचे आवाहन
येत्या रविवार दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6 ते 9 यावेळेत दिव्यदृष्टी संस्थेने नगर शहरातील सावेडी येथील माऊली सभागृहात “स्वर दिपावली” या अनोख्या संगीत मैफिलीचे आयोजन केले आहे. स्वतः अंध- दिव्यांग असणारे कलाकार या संगीत मैफिलीत गायन वादन यांचे सादरीकरण करणार असून रसिक नगर कर यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दिव्यदृष्टी संस्थेने केले आहे. या स्वर मैफिलीचे उद्घाटन आदर्श गाव चळवळीचे प्रणेते पदमश्री पोपटराव पवार , हॉटेल उद्योगातील नगर चे कोहिनूर धनेश बोगावत, जगप्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे, नवोदित सिनेअभिनेते महेश काळे, उद्योजक, विमा चळवळीचे प्रणेते प्रेरक वक्ते एन बी धुमाळ, ब्रिगेडियर राजू चावला यांच्या उपस्थित होणार आहे.तरी जास्तीत जास्त नगर कर यांनी या दिव्यदृष्टी संस्थेला पाठबळ व मैफिलीला उपस्थित राहण्याचे आवाहन दिव्यदृष्टीचे कृष्णा तवले, धवण उम्रेडकर, निलेश शिंदे, सुभाष शिंदे, सुनील बाचकर, किरण खेतमाळस यांनी केले आहे.
स्वर दीपावली संगीत मैफिलीत या अंधांची ऐकायला मिळणार संगीत साधना
गांधर्व विश्व विद्यालय व सुगम संगीत विद्यालय द्वारा संगीत विशारद निलेश शहादेव शिंदे, सुहास नरवडे तसेच अलका शिंदे, वर्षा पड्याळ हे या मैफिलीत गाणार आहेत. अंकुश जाधव, मनोज धावारे, स्वप्नील पड्याळ, सौदागर लोंढे , सलीम अत्तार , महेश नेऊल आदी कलाकार आपल्या संगीत सहभागातून या मैफिलीत उपस्थितांची मने रिझवणार आहेत. नगर आकाशवाणी चे ख्यातकीर्त निवेदक नितीन जावळे या मैफिलीचे सूत्र संचालन करणार आहेत. हे सर्व कलाकार अंध – दिव्यांग असल्याने रसिक नगर करांनी त्यांची उपस्थिती मैफिलीला द्यावी असे दिव्य दृष्टीच्या कलाकार यांनी नगरकर यांना कळविले आहे.
अंध-अपंग-मूकबधिर यांचे जीवन स्वावलंबी करण्यासाठी झगडणाऱ्या स्वतः दिव्यांग- अंध असणा-यांची दिव्यदृष्टी ही संस्था नव्याने नगर शहर व जिल्ह्यात दिव्यांग यांच्या शिक्षणासाठी कार्यरत झाली आहे. स्वतः दिव्यांग असणारे या संस्थेचे सर्व संचालक समाजात प्रेरणा असल्याने अशा संस्थेच्या मैफिली यांना जनाधार मिळाल्यास चांगले दिव्यांग कलाकार समाजासमोर आणण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष कृष्णा तवले, संचालक सुभाष शिंदे , सचिव ढवण उम्रेडकर यांनी माध्यमांना सांगितले आहे. शहर व जिल्ह्यातील अंध कलाकार यांना एकत्रित करून दिवाळी निमित्त येत्या रविवारी होणारी स्वर दीपावली ही संगीत दिवाळी ठरणार आहे. या संगीत मैफिलीस प्रायोजक ,सह प्रायोजक म्हणून आर्थिक मदत सामाजिक संवेदनशील नगरकर करू शकणार आहेत. या मैफिलींसाठी व संस्थेस दिलेल्या सर्व आर्थिक देणग्यांना आयकर कलम 80 जी नुसार आयकरात सवलत आहे. दिव्य दृष्टीला देणगी देण्यासाठी गायक निलेश शिंदे (9420161923) , संस्थेचे संचालक सुभाष शिंदे (9049833060) यावर संपर्क करण्याचे आवाहन दिव्य दृष्टीने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे.