अहिल्यानगर तारकपूर एस.टी. स्टॅण्डला लोकशाहीरआण्णाभाऊ साठे बस स्टॅण्ड नाव द्यावे –
राजेंद्र घोरपडेकेंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर (आण्णा) मोहोळयांना निवेदन
नगर – अहिल्यानगर हे जिल्ह्याचे ठिकाण असून या ठिकाणी माळीवाडा, पुना बस स्टॉप, आणि तारकपुर एस.टी. स्टॅण्ड अशा नावाने ओळखलं जाते. पैकी म्हणजेच तारकपूर भागातील स्टॅण्डला लोकशाहीर आण्णाभाऊ साठे बसस्थापनक असे नामकरण करण्याबाबत बरेच नागरिक आणि वैयक्तीक असे नामरकरण करावे, अशी मागणी केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्य मंत्री मुरलीधर (अण्णा) मोहोळ यांना भारतीय जनता पार्टी दलित अहिल्यानगर शहर अध्यक्ष सरचिटणीस राजेंद्र घोरपडे यांनी निवेदना व्दारे केली.
अहिल्यानगर शहरात सावेडी हा भागात खुप लोकसंख्या वाढलेली असून त्या जवळच असलेल्या तारकपूर हे मोठे असे बसस्थानक असून तेथून जिल्हा आणि पर राज्यात सुध्दा बस ये जा करतात अशा मोठ्या बसस्थानकास मोठ्या माणसाचे नाव देणे योग्य ठरेल. दि. 20/05/2017 रोजी जिल्हाधिकारी एस.टी महामंडळ यांना निवेदन देण्यात आले होते. आत्तापर्यंत या गोष्टीचा गांभीर्याने कोणीही विचार केलेला नाही. तेव्हा तारकपूर मधील बसस्थानकास लोकशाहीर आण्णाभाऊ साठे बसस्थानक असे नाव देण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी आ.संग्रामभैय्या जगताप, भारतीय जनता पार्टी दलित अहिल्यानगर शहर अध्यक्ष सरचिटणीस राजेंद्र घोरपडे, अशोक भोसले, शितल गाडे, येशुदास वाघमारे, सुनंदा कांबळे, बाबासाहेब चांदणे आदी उपस्थित होते.
दि.1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती असून जयंतीच्या औचित्याने हा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावे, ही मागणी त्यांनी यावेळी केली.