आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा; शिक्षक दिनाचा मुहूर्त साधून शिक्षकांचा केला सन्मान
अहमदनगर : जिल्हा परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना या पुरस्काराची प्रतीक्षा होती. यंदाही या पुरस्कारांचा मुहूर्त टळण्याची शक्यता होती. परंतु शिक्षण विभागाने शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कारांची घोषणा केली. चौदा तालुक्यांतून प्रत्येक एक व एका केंद्रप्रमुखास हे पुरस्कार दिले जाणार आहेत. दरवर्षी ५ सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या दिवशी उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व केंद्रप्रमुख यांना जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येते.
“पुरस्कारार्थी शिक्षक”
■ पुष्पा लांडे : शिळवंडी (अकोले)
■ संजय कडलग : सावरगाव तळ (संगमनेर)
■ पितांबर पाटील : दशरथवाडी (कोपरगाव)
■ ललिता पवार : गमेगोठा (राहाता)
■ योगेश राणे : शिरसगाव (श्रीरामपूर)
■ सुनील लोंढे : उंबरे (राहुरी)
■ सुनील आडसूळ : सोनवणे वस्ती (नेवासा)
■ गोरक्षनाथ बर्डे : कन्हे टाकळी (शेवगाव)
■ नामदेव धायतडक : सोमठाणे नलवडे (पाथर्डी)
■ बाळू जरांडे : पवारवस्ती (जामखेड)
■ दीपक कारंजकर : मिरजगाव मुले (कर्जत)
■ स्वाती काळे : पवारवाडी (श्रीगोंदा)
■ प्रकाश नांगरे : सोबलेवाडी (पारनेर)
■ वर्षा कचरे : शिंगवे नाईक (अहमदनगर)
■ ज्ञानेश्वर जाधव : केंद्रप्रमुख (शेवगाव)