अहमदनगर (प्रतिनिधी):
मोहंमद पैगंबर यांची जयंती ईद मिलादुन्नबी म्हणजेच (झेंडा ईद) म्हणून शुक्रवार दि.30 ऑक्टोंबर रोजी सर्वत्र साजरी होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी शहरातील टकटी दरवाजा येथे मोहंमद पैगंबर यांचे पवित्र केस (हजरत बाल) भाविकांच्या दर्शनासाठी ऑनलाईनद्वारे खुले करण्यात येणार आहे.
नगरला परंपरेनुसार दरवर्षी फक्त हजरत मोहंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनीच पवित्र केस दर्शनासाठी खुले करण्यात येतात.
यावर्षी नागरिकांना ऑनलाईन दर्शनची सोय करण्यात आली असून, भाविकांना घरी थांबूनच आय लव्ह नगर या अॅपवर व फेसबुक पेजवर लाईव्ह हजरतबलचे दर्शन घ्यावे. तसेच यावर्षी इतर धार्मिक उत्सव रद्द करण्यात आले असल्याची माहिती पुजारी सय्यद बुर्हाण कादरी चिश्ती यांनी दिली.