सुंदर पिचाई  यांचं नाव उच्चारणे  अमेरिकन सिनेट सदस्यांना अवघड 

'पिक-आय' ते 'पी चाय'

नवी दिल्ली :  

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचं नाव उच्चारणं अमेरिकनांसाठी  काहीसं कठिण झालं आहे. त्यामुळे काही सिनेट सदस्यांनी त्यांना ‘पिक-आय’ म्हणून संबोधलं तर काहींनी ‘पी चाय’ म्हणून संबोधलं.  सिनेटरच्या या उच्चारांमुळे आता नेटकऱ्यांनी त्यांची त्यांची सोशल मीडियावर चांगलीच खेचण्यास सुरुवात केली आहे.

गूगल, फेसबुक आणि ट्विटर सारख्या बड्या अमेरिकन कंपन्यांना सिनेटच्या एका बैठकीसाठी पाचारण करण्यात आलं होतं. ही व्हर्च्युअल मिटिंग होती.  यावेळी कॉमर्स, सायन्स आणि ट्रान्सपोर्टेशन कमिटीचे चेअरमन रोजर विकर यांनी सुरुवातीलाच सुंदर पिचाई यांचा उल्लेख करताना ‘पिक-आय’ असा केला.

सुंदर पिचाई  यांचं नाव उच्चारणे  अमेरिकन सिनेट सदस्यांना अवघड 

 त्यानंतर सिनेटर कोरी गार्डनर, एमी क्लोबूचर यांनीही पिचाई यांचा चुकीचा उल्लेख केला.  क्लोबूचर यांनी तर पिचाई यांचा उल्लेख ‘पी चाय’ असा केला.  त्यानंतर अनेक सिनेटरने ‘पिक आय’ किंवा ‘पी चाय’ असाच पिचाई यांचा उल्लेख केला.  त्यामुळे नेटकऱ्यांनी या सिनेटरची सोशल मीडियावरून चांगलीच खिल्ली उडवली आहे.
https://youtu.be/ALtb7D5oOF4