भामट्याने केली चक्क पोलिसांचीच फसवणूक.
ऋषिकेश राऊत
अहमदनगर प्रतिनिधी :-
सांताक्रूझ ईस्ट सीनियर पीआय सावंत बोलतो’ असे सांगून चक्क एका भामट्यानेच कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलिसांची फसवणूक केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद झाला.
यावेळी बोलतांना पोलिसांनी सांगितले, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या दूरध्वनीवर ८७७९४७६५६९ या मोबाईलवरून शनिवारी १० वाजून ४५ मिनिटांनी फोन आला.
या फोनवर मी सांताक्रूझ ईस्ट सीनियर पीआय सावंत बोलतो असे सांगून आम्ही सध्या तावडे हॉटेल कोल्हापूर कमान हायवे ब्रीजजवळ एका आरोपीला पकडले आहे. आमच्या मदतीकरिता मार्शल पाठवून द्याव मार्शलचा फोन नंबर मला द्या, असे सांगितले. त्यावर ठाणे अंमलदारांनी संबंधित अज्ञात संशयितास मार्शलचा मोबाईल क्रमांक दिला.
खोटी माहिती दिली
• संशयिताने पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानास परस्पर फोन करून त्यांना दुसरीकडे बोलवून घेतले व दुसरीच कारवाई करून घेतली. हा सर्व प्रकार इंडियन ऑईल पेट्रोल पंप कसबा बावडा परिसरात घडला.
• अप्रामाणिकपणे खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याची बाब उघडकीस आल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोपट गावित (नेमणूक शाहूपुरी पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली. दुसरी नेमकी काय कारवाई करून घेतली हे मात्र पोलिसांनी सांगण्यास नकार दिला.