आईचेच ऐकतो म्हणून पत्नीने पती, सासू व दिराला केली मारहाण

पत्नीसह सहा जणांवर लूट व मारहाणीचा गुन्हा दाखल

नवरा त्याच्या वयोवृद्ध आईला संभाळतो, तो तिचेच सर्व काही ऐकतो. म्हणून पत्नी बिड जिल्ह्यातील आपल्या सासरकडच्या लोकांना घेऊन आली. आणि नवरा, दिर व वयोवृद्ध सासूला गज व काठीने बेदम मारहाण करत त्यांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले. ही घटना राहुरी फॅक्टरी येथे दिनांक २३ जुलै रोजी घडली.यातील आरोपी व फिर्यादी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. निलेश लांडगे याची पत्नी ही वयोवृद्ध सासूला संभाळायचे नाही. नवरा सर्व काही सासूचे ऐकतो. या कारणावरुन काही दिवसांपासून नांदत नव्हती.

 

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा.

 

 

दिनांक २३ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान यातील आरोपी निलेश अनिल लांडगे याच्या घरी आदिनाथ वसाहत, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी. येथे आले. त्यावेळी त्यांनी निलेश लांडगे याची आई व भावास लाथा बुक्क्यांनी मारहाण करून वयोवृद्ध आईला काठीने मारहाण करून तिचे गळ्यातील पोत बळजबरीने तोडुन घेतली. त्यावेळी निलेश लांडगे त्यांना म्हणाला की, तुम्ही आई व भावास मारहाण करू नका. तेव्हा आरोपी म्हणाले कि, तू आईला सांभाळायचे नाही. असे सांगुन सुध्दा तू आईला का सांभाळतो. असे म्हणुन त्यांनी निलेश लांडगे याला गजाने मारहाण केली. तसेच त्याच्या गळ्यातील एक तोळा वजनाची सोन्याची चैन बळजबरीने तोडुन घेतली. आणि घरातील संसार उपयोगी सामान, लाकडी कपाट, लोखंडी कपाटातील सामान काढुन अस्ताव्यस्त फेकुन दिले. तसेच टिव्ही व मोबाईल फोडुन नुकसान केले. त्याचबरोबर जिवे मारण्याची धमकी दिली.

 

 

 

 

 

निलेश अनिल लांडगे याच्या फिर्यादीवरून आरोपी जितेंद्र नारायण भुजंगे, रविंद्र नारायण भुजंगे, नारायण बापुराव भुजंगे, वच्छलाबाई नारायण भुजंगे, सिमा निलेश लांडगे तसेच एक अनोळखी महिला सर्व राहणार नेकनुर जि. बीड. या सहा जणांवर मारहाण व लूटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक निलेशकुमार वाघ हे करीत आहेत.