राजाभाऊ मुळे लिखित ‘आत्मनिर्भर भारतः विश्व गुरू भारतङ्क या पुस्तकाचा उद्या प्रकाशन सोहळा  

https://youtu.be/RCYGgO_VjZwअहमदनगर :  
गेल्या सात महिन्यातील सर्व मनुष्यजाती पुढे आलेल्या संकटातून संधी शोधत भारताची सुरू झालेली आत्मनिर्भरतेकडील वाटचाल आणि आपल्या जीवन शैली आणि विचार वैभवाच्या आधारावर विश्वगुरू पदी भारतमातेची होवू घातलेली अटळ पुनर्स्थापना याचा वेध घेणारे प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक इंजिनिअर रवींद्र गणेश तथा राजाभाऊ मुळे लिखित ‘आत्मनिर्भर भारतः विश्व गुरू भारतङ्क या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार, दि.३०.१०.२०२० रोजी सायं. ७ वाजता फेसबुक लाईव्ह होणार आहे.
 परमपूज्य आचार्य गोविंददेव गिरी महाराज यांच्या शुभहस्ते आणि प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते प्रदीप लोखंडे यांच्या
अध्यक्षतेखाली संपन्न होणाèया या प्रकाशन सोहळ्यात प्रसिध्द अर्थतज्ञ श्री विनायक गोविलकर यांचे प्रमुख भाषण होणार आहे. प्रसिध्द उद्योजक श्री उल्हास लाटकर आणि प्रासिध्द वास्तूुविशारद श्री कैलास सोनटक्के यांची
प्रेरणादायी उपस्थिती या कार्यक्रमात राहणार आहे. परम पुज्य श्री. गोविंददेव गिरी महाराज यांचा कृपा आशीर्वाद प्रस्तावनेच्या रूपाने या पुस्तकाला लाभलेला आहे.
कोविड १९ काळात जगाला आश्चर्य वाटावे असा लढा देत आपण भारत देश म्हणून आणि भारतीय नागरीक म्हणून
एका नव्या युगात जणू प्रवेश करत आहोत. हे नवं युग म्हणजे आत्मनिर्भर भारताचे युग असणार आहे. ही आत्मनिर्भरताच आपल्याला नियतीने सोपवलेली विश्वगुरू म्हणून जबाबदारी पार करण्यास सक्षम करणारं आहे.
कसा दिला आम्ही हा लढा ? कसा होणार आहे आमचा आत्मनिर्भरतेचा प्रवास ?  काय आहे आमच्या समाजाचे या सगळ्याचा आढावा घेणारे ‘आत्मनिर्भर भारत : विश्व गुरू भारतङ्क या रवींद्र (राजाभाऊ) मुळे लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास फेस बुक लाईव्हच्या माध्यमातून     www.facebook.com/evyakhyanmala किंवाुुु www.youtube.com/evyakhyanmala या
दोन्ही लिंक द्वारे आपण सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री रवींद्र सोनवणे, श्री आण्णा धुमाळ व श्री मिलिंद देशपांडे  यांनी केले आहे.
 कुठलीही व्यवसायिक पार्श्वभूमी नसताना, गेली ३३ वर्ष नगर शहरात बिल्डर, कन्सल्टिंग इंजिनिअर व्हॅल्युअर म्हणून नाव लौकिक मिळविलेल्या व सामजिक कामाची आवड आणि संघ संस्कार यातून सतत संघाचे विविध स्तरावर दायित्व घेवून काम करतांना आलेले अनुभव भेटलेल्या व्यक्ती आणि प्रचलित काळातील घटनाक्रम यावर गेल्या काही वर्षात सामाजिक माध्यामावर व्यक्त होत असतांना त्यांचे लेखन लोकप्रिय होत आहेत याच लेखनावर आधारित परिसवेध, विचारवेध हे पुस्तक रूपाने प्रकाशित झाली. यातील परिसवेध हे पुस्तक वाचकाना खूप भावले त्याची तिसरी आवृत्ती देखील प्रकाशनाच्या मार्गावर आहे. चित्रपट सृष्टी आणि क्रीडा क्षेत्रातील विविध विषयावर पण त्यांनी विशेष लेखन केले आहे.
आगामी काळात अजून काही पुस्तकं प्रकाशनाच्या मार्गावर राहणार असून सामजिक काम करताना थेट लोकसंपर्क
आणि त्यातून चिंतनशील स्वभाव याचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात जाणवते. सहज सोप्या शब्दात त्यामुळे ते लोकांपर्यत पोहचते प्रस्तुत पुस्तक हे ही एका सर्वसामान्य भारतीय नागरीकाने आपल्या वाचकांशी केलेला एक संवादच आहे असद यावेळी सांगण्यात आलं आहे.
https://youtu.be/RCYGgO_VjZw