श्रीराम चौक परिसरात बुधवारी वृक्षारोपण व परिसर सुशोभीकरण समारंभ

कबीर केक्स चे चेमटे यांनी स्वीकारले वृक्षांचे पालकत्व

                      महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधील श्रीराम चौक इथे वृक्षारोपण आणि परिसर सुशोभीकरण अभियान राबवण्यात आले. या अभियानाची संकल्पना प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक निखिल वारे याची आहे. नगरचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर गणेश भोसले होते. कार्यक्रमासाठी नगरसेवक बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनील त्र्यंबके, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रायोजक कबीर केक्स चे राजन चेमटे होते.

 

 

                                  कबीर केक्स चे सांचालक चेमटे यांनी, या  प्रभागात फक्त वृक्षारोपण च केले नाही तर प्रभागातील वृक्षांच्या पालकत्वाची जबाबदारी ही स्वीकारली आहे. याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो, असे उद्गार नगरसेवक निखिल  वारे यांनी काढले. आपण जिथे राहतो त्या जागेचे काहीतरी देणे लागतो या भावनेने त्यांनी हे कार्य केलं आहे. असे ही वारे म्हणाले. राज्यभरात विविध माध्यमातून वृक्षचळवळ होतेय, त्यात आपला  खारीचा वाटा असावा या साठी हे वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचा उपक्रम हाती घेतला असल्याचे कबीर केक्स चे राजन चेमटे म्हणाले.

 

 

                               परिसरातील नागरिकांनी ही ह्या वृक्षांची काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले. आत्ता आपण जितके जास्त वृक्ष लागवड करू, तितकाच जास्त ऑक्सिजन आपल्या पुढच्या पिढयांना मिळेल. तसेच निसर्गचक्र ही सुरळीत सुरु राहील . असे प्रतिपादन जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशन चे शिवाजी पालवे यांनी केले.  या प्रसंगी महापालिकेचे उपमहापौर गणेश भोसले यांनी ही आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी आ. संग्राम जगताप यांनी ही चेमटे  यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

 

 

                                  आगामी काळात मनमाड रोड च्या काँक्रिटीकरणाचे कामाचा प्रस्ताव शाशनाकडे वर्ग केला असून त्याचा पाठपुरावा सुरु असल्याचे ही सांगितले. कार्यक्रम प्रसंगी   आ. संग्राम जगताप,  उपमहापौर गणेश भोसले, प्रायोजक कबीर केक्स चे राजन चेमटे अरिफ शेख, सुरेश बनसोडे, नगरसेवक निखिल वारे, सुनील त्र्यंबके, बाळासाहेब पवार, विनीत पाऊलबुद्धे, जय हिंद फाऊंडेशन चे शिवाजी पालवे आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. या वेळी चेमटे यांनी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुछ भेट देऊन सत्कार केला.