मावळ परिसरात शिवणे इथे बेकायदेशीर बैलगाडी शर्यतीचे आयोजन

२१ जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

                  राज्यात बैलगाडा शर्यतीवर महाराष्ट्रात बंदी असताना पुणे जिल्ह्यातील मावळ परिसरात  शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते . घंटेची माहिती पोलिसांना मिळताच बैलगाडी शर्यतीचे आयोजन करणाऱ्या २१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बैलगाडा शर्यतीचे आयोजन मावळमधील शिवणे येथे करण्यात आले होते.

 

 

 

                      पोलीस कर्मचारी आशिष अर्जुन काळे यांनी या घटनेप्रकरणी फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोना संकटातून देश जात असताना आणि बैलगाडा शर्यतीवर बंदी असून ही बैलगाडा शर्यतीच आयोजन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वडगाव मावळ पोलिसांत याप्रकरणी गाडा मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश दत्तात्रय म्हस्के, हनुमंत शिवाजी म्हस्के, विक्रम बाळासाहेब केडे, आदिनाथ बाळू गराडे, आदिनाथ बाळू म्हस्के, मनोज अंकुश ढोरे यांच्यासह २१ जणांवर गुन्ह दाखल करण्यात आला आहे.

 

 

                         याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सकाळी दहाच्या सुमारास मावळमधील शिवणे येथे बैलगाडा घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना नियमांचे उल्लंघन करत शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. बैलांना यातना होईल, अशा प्रकारे क्रूरतेनं व निर्दयपणे वागवून बैलगाडा चढणीच्या रस्त्याने घाटात पळवण्यात आले. क्षमतेपेक्षा आणि ताकदीपेक्षा बैलांचा छळ केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.