पद्मश्री पोपट पवारांच्या हस्ते गावाच्या फाट्यावर वृक्षरोपण

पक्षीय राजकारण सोडून सामाजिक कार्यातून गावाचा विकास निश्‍चित असल्याचे पवार यांनी कार्यातून दाखवले -पै. नाना डोंगरे

 

 

नगर-कल्याण रोड, निमगाव वाघा फाटा (ता. नगर) येथे पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भारत सरकारच्या वतीने समाजसेवेतील पद्मश्री पुरस्कार घेऊन गावी परतताना पवार यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळण्यासाठी गावाच्या फाट्यावर वृक्ष लावण्यात आला आहे.

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राइब करा. 

 

 

निमगाव वाघा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने पवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, जिल्हा परिषद बांधकाम समिती माजी सभापती रावसाहेब पाटील शेळके, माजी सरपंच साहेबराव बोडखे, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कांडेकर, डॉ. विजय जाधव, पै. अनिल डोंगरे, उद्योजक अरुण फलके, दिलावर शेख, अ‍ॅड. संतोष गायकवाड, भाऊसाहेब जाधव, कचरु पुंड, सुभाष जाधव, अंबादास निकम, निलेश पुंड, अरुण कापसे, ज्ञानदेव कापसे, संजय फलके, संतोष रोहोकले, संजय कापसे, दीपक गायकवाड, अक्षय पुंड, अजय ठाणगे, बाबासाहेब पुंड, पिंटू जाधव, रवी पुंड, अंबादास पुंड आदी उपस्थित होते.

 

 

 

नाना डोंगरे म्हणाले की, पद्मश्री पोपट पवार यांचे कार्य जिल्ह्यातील सर्व गावांना प्रेरणा देणारे व आदर्श आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. शेजारी असलेल्या गावाचा कायापालट पोपट पवार यांच्या दूरदृष्टीने झाला. जलसंधारण, वृक्षरोपण, मृदासंधारण, व्यसनमुक्ती आदी विविध कल्याणकारी उपक्रम राबवून त्यांनी हिवरेबाजारला देशाच्या नकाश्यावर आनले. त्यांच्या प्रेरणेने इतर गावात कार्य सुरु आहे. पक्षीय राजकारण सोडून सामाजिक कार्यातून गावाचा विकास निश्‍चित असल्याचे त्यांनी कार्यातून दाखवले असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांनी निंबळक गटातील हिवरेबाजार मध्ये केलेल्या कार्याबद्दल पोपट पवार यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार अभिमानास्पद आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून निमगाव वाघा ग्रामस्थांनी लावलेले झाड प्रेरणारुपी ऊर्जा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद बांधकाम समिती माजी सभापती रावसाहेब पाटील शेळके यांनी पुस्तके भेट देऊन पवार यांचा सत्कार केला. या आगळ्या-वेगळ्या पध्दतीने केलेल्या स्वागताचे पोपट पवार यांनी आभार मानले.