जिल्हा रुग्णालय अग्निकांडप्रकरणी परिचारिकांवर करण्यात आलेली कारवाई मागे घ्यावी

आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाचे आरोग्य मंत्रींना निवेदन

अहमदनगर

 

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आग प्रकरणी परिचारिकांचे निलंबन व सेवासमाप्तीची कारवाई मागे घेण्याची मागणी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पाठविण्यात आले आहे. तर जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी केलेल्या काम बंद आंदोलनास पाठिंब्याचे पत्र सार्वजनिक आरोग्य परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा आंधळे व जयमाला पवार यांना देण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय मानव अधिकारचे जिल्हा चेअरमन पंकज लोखंडे, अनिल गायकवाड, शरद महापुरे, संदीप कापडे, पॉल भिंगारदिवे आदी उपस्थित होते.

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राइब करा. 

 

अहमदनगर जिल्हा रुग्णालयतील अतिदक्षता विभागात शॉटसर्किटने 6 नोव्हेंबर रोजी आग लागली. या दुर्घटनेत 11 रुग्णांचा बळी गेला. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून परिचारिकांवर गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर निलंबन व सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली. महिला परिचारिकांचा या घटनेशी काहीही संबंध नसून, त्यांना फायरचे प्रशिक्षण देखील नव्हते. त्यांच्यावर विनाकारण कारवाई करण्यात आली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.