केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा  माजी आ. हर्षवर्धन  जाधव यांना  मारण्याचा कट

राजकीय फायद्यसाठी  केला गेला कट 

पुणे:

हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हर्षवर्धन जाधव यांना अटक केल्यानंतर आज शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने त्यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान हर्षवर्धन जाधव यांनी न्यायालयात फिर्यादीनंच आपल्याला मारहाण केली असल्याचा दावा केला. तसंच आपल्यावर दाखल झालेला गुन्हा आणि अटक राजकीय असल्याचाही आरोप केला.

 

हर्षवर्धन जाधव न्यायालयासमोर बाजू मांडताना म्हणाले की, “आपल्यावर दाखल झालेला गुन्हा आणि अटक राजकीय हेतूने आहे. माझी सहकारी इशा झा हिच्यासोबत पुण्यातील बावधन भागातील एका दुकानात गेलो होतो, तेव्हा फिर्यादीने दोघांचे अपहरण आणि मारहाण केली”. हर्षवर्धन जाधव यांनी यावेळी पोलीस आपली तक्रारच घेत नव्हते असा आरोपही केला. याशिवाय मारहाणीची घटना सोमवारी घडलेली असताना मंगळवारी संध्याकाळी गुन्हा दाखल झाला असं सांगत यामागे राजकीय हात असल्याचा दावा त्यांनी केला

हर्षवर्धन जाधव यांच्यावतीने ॲड. झहीरखान पठाण, ॲड. सत्यजीत कराळे पाटील, ॲड अनु वर्गीस हे काम पाहत आहेत