लसीला सुट्टी नाही ; लसीकरण आता नॉनस्टॉप
एप्रिल मध्ये दरोरोज लस ; लसीकरण वाढवण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय
देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा १ यावरील पासून सुरु झाला आहे , यामध्ये ४५ आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना हि लस दिली जात आहे .
दरम्यान कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि देशात लसीकरण केंद्राच्या कमाल क्षमतेचा वापर करण्यासाठी एप्रिल महिन्यात सरकारी आणि खाजगी केंद्रावर दरोरोज लसीकरणाचा निर्णय केंद्राने घेतला आहे .
म्हणजे सरकारी सुट्टीच्या दिवशीही लसीकरण केंद्रे खुली राहतील .
कोरोना रुग्णसंख्येतील वाढ रोखण्यासाठी देशात आता ‘नॉनस्टॉप’ लसीकरण सुरू राहणार आहे.
यासंदर्भात केंद्र सरकारने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे.
सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही लसीकरण सुरू ठेवण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करा, अशा सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत.