पुणे, नाशिक, नगर, कल्याण महामार्गावर वर्षभरात 41,455 वाहनांवर कारवाई

आळेफाटा : पुणे, नाशिक, नगर, कल्याण महामार्गावर बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करत, महामार्ग वाहतूक पोलिसांच्या आळेफाटा केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी एक जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 41,455 वाहन चालकांवर मोटारवाहन अधिनियमाच्या विविध कलमांवर कारवाई केली. त्यांच्याकडून तब्बल 4 कोटी 74 लाखांचा दंड वसूल केला गेला. खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे, नाशिक राष्ट्रीय महामार्गाची लांबी राजगुरुनगर टोलनाका ते आळेखिंड अंतर 77 कि.मी. आहे. तर जुन्नर तालुक्यातून जाणाऱ्या कल्याण, अहमदनगर महामार्गाची लांबी ६५ कि.मी. आहे. मंचर ते भीमाशंकर, जुन्नर ते नारायणगाव या मार्गावर आळेफाटा केंद्र महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांकडून लक्ष ठेवले जाते. नगर-कल्याण महामार्गावर वेग मर्यादेचा नियम पादळी तूडवल्या प्रकरणी 15,182 वाहन चालकांवर कारवाई झाली आहे. वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणाऱ्या 302 वाहन वाहकचालकांवर मालवाहू वाहनात प्रवाशांची वाहतूक करताना 427 वाहन चालकांवर कारवाई करून त्यांना दोन लाख 27 हजार रुपये सिटबेल्ट न वापरणाऱ्यांना 4,678 वाहन चालकांवर दंड आकारला गेला. काचांवर काळी फिल्म वापरणाऱ्या वाहन चालकांकडून 14 लाख 66 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विना हेल्मेट 5000 वाहन चालकांना 25 लाखांचा दंड लेन शिस्तीचे पालन न करणाऱ्या पाच हजार दोनशे वाहन चालकांना 49 लाख 50 हजार रुपये दंड केला गेला.