कुकाण्याचा विनायक कलेक्टर होणार…

युपीएससी परीक्षेत राज्यात दूसरा ; देशात सदतीसावा

 (वैष्णवी घोडके )

 

                               नुकत्याच जाहीर झालेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) निकालात नेवासा तालुक्यातील कुकाणे येथील विनायक कारभारी नरवडे यांनी देशात ३७ तर राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला. विनायकच्या यशाची बातमी समजताच कुकाण्यात आनंदोत्सव साजरा केला. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल शुक्रवार( ता. २४ ) रोजी लागला. त्यामध्ये कुकानेतील प्रसिद्ध डॉक्टर नरवडे हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कारभारी नरवडे यांचे चिरंजीव विनायक नरवडे यांनी देशात ३७ वा तर राज्यात द्वितीय क्रमांक मिळवत यश संपादन केले. विनायक यांचे प्राथमिक शिक्षण नगर येथील आठरे पब्लिक स्कूल तर उच्च माध्यमिक चे शिक्षण सारडा महाविद्यालयात आणि उच्च शिक्षण कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणे येथे झाले.

 

 

 

 

हे ही पहा आणि सब्स्क्राईब करा. 

 

 

 

                                             अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यावर विनायक यांनी अभियांत्रिकी चे पुढील उच्च शिक्षण  ( एम. एस. इंजिनीअरिंग ) अमेरिकेत न्यूयोर्क मध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीत पूर्ण करुण अमेरिकेत एक वर्ष नोकरी केली. मात्र, प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय निश्चित केलेल्या विनायक नरवडे हे दोन वर्षापूर्वी अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात आले. त्यांनी तीन महीने दिल्लीत युपीएससी चा अभ्यास केला. मात्र कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर त्यांना नगर येथे यावे लागले. दुसर्‍या प्रयत्नात युपीएससी चा गड राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होत सर केला आहे.