माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी, अहमदनगरमध्ये १७ ठिकाणी मदत कक्ष सुरु : यशवंत डांगे
अंगणवाडी सेविका नियुक्त
अहमदनगर : महाराष्ट्र शासनाने खास महिलांच्या आरोग्य आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी गेल्या महिन्यात जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी अहमदनगरमध्ये पालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी शहरामध्ये १७ ठिकाणी मदत कक्ष सुरु केल्याची माहिती दिली. तसेच हि योजना घरोघरी असणाऱ्या महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी फिरून महिलांकडून या योजनेचे फॉर्म भरून घेण्याचे काम करण्यासाठी नियुक्त केल्या आहेत. अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. याशिवाय यासंदर्भात बोलताना डांगे म्हणाले, आजवर ज्या महिलांनी हे फॉर्म भरले नसतील त्यांनी हे फॉर्म लवकरात लवकर भरावे जेणे करून लवकरात लवकर महिलांच्या खात्यात शासनाकडून येणारी रक्कम जमा होईल आणि त्याचा लाभ गरजू महिलांना नक्कीच मिळेल.