अ‍ॅपेक्स हाॅस्पिटलमध्ये शिबिरात १२५ रुग्णांची माेफत तपासणी

अहमदनगरमधील  अ‍ॅपेक्स हाॅस्पिटल मेल्टिस्पेशालिटीच्या वतीने माेफत आराेग्य तपासणी शिबिर आयाेजित करण्यात आले होते.  या शिबिरात सुमारे १२५ रुग्णांची माेफत तपासणी करण्यात आल्याची माहिती अ‍ॅपेक्स हाॅस्पिटलचे संचालक किडनी विकार तज्ज्ञ डाॅ. साईप्रसाद शिंदे यांनी दिली.

या शिबिराला दीपप्रज्वलनाने सुरूवात झाली. अ‍ॅपेक्स हाॅस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. संताेष गांगर्डे यांनी प्रास्ताविक केले. डाॅ. धनंजय वारे, डाॅ. ईश्वर कणसे, डाॅ. महेश जरे, डाॅ. प्रशांत काळे, डाॅ. दिलीप बागल, डाॅ. कृणाल काेल्हे, डाॅ. सचिन साेलाट, डाॅ. नय्यर हरीश शिबिराला आदि डॉक्टर  उपस्थित हाेते. या शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांच्या वैद्यकीय तपासणी सवलतीच्या दरात करण्यात आल्या. तसेच काही रुग्णांना तपासणीत किडनीचं साैम्य आजार आढळून आले. त्यावर मार्गदर्शन करून औषधोपचार देण्यात आल्याचेही डाॅ. शिंदे यांनी सांगितले.

डाॅ. साईप्रसाद शिंदे म्हणाले, “किडनी हा शरीरातील अवयव म्हणजे फिल्टर आहे. शरीर शुद्ध ठेवण्याचे कार्य किडनी करत असते. या अवयवाची काळजी घेतल्यास काेणताही आजार हाेणार नाही. या अवयवाकडे दुर्लक्ष केल्यास वेगवेगळे आजार उद्धभवू शकतात. अहमदनगर शहरासह पाथर्डी, शेवगाव, नेवासे, श्रीगाेंदे, राहुरी, श्रीरामपूर, पारनेर या तालुक्यांसह बीड जिल्ह्यातूनही रुग्ण या शिबिरात सहभागी झाले हाेते.