विक्रमवीर सायक्लिस्ट आणि बाईकर शरद काळे पाटील यांनी पार केले औरंगाबाद नागपूर अंतर फक्त तीन तासात.
नव्याने झालेल्या शिर्डी नागपूर समृद्धी महामार्गावर वेगवान प्रवास करण्याची भुरळ सर्वानाच पडलीय. या महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर या महामार्गावरून प्रवास करण्याचा मोह शरद काळे पाटील यांना आवरता आला नाही. त्यांनी त्यांचे सहकारी मित्र विक्रम वीर सायकलिस्ट आणि बाईकर शरद काळे पाटील यांना सोबत घेऊन या महामार्गाची सफर करण्याचे ठरवले. चालकाच्या सीटवर शरद काळे पाटील बसल्यानंतर त्यांच्या डोक्यात कमीत कमी वेळेत नागपूर गाठण्याची कल्पना घोळतच होती आणि त्यांनी ते आले त्यांनी पहिले आणि त्यांनी जिंकले या प्रमाणे औरंगाबाद ते नागपूर हे अंतर अवघ्या ३ तासात पार करून दाखवले.
फास्टेस्ट सायकलिंग आणि बायकिंग मध्ये विक्रमांचे नवनवीन उच्चांक प्रस्थापित करून नगरचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचविणाऱ्या शरद काळे पाटील यांनी या मोहिमेचे नियोजन करून प्रायोजित केली होती.
खरोखरच राज्य आणि केंद्र शासनाने संयुक्त पणे निर्माण केलेला समृद्धी महामार्ग खूपच सुंदर असून देशाला गतिमानता प्राप्त करून देणारा आहे. या रस्त्यामुळे उत्तर भारत हा दक्षिण भारताला जोडला जात असून विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा याना देशाची आर्थिक राजधानी मुंबई अधिक जवळ आली आहे.
हा समृद्धी महामार्ग अतिशय चांगला झाला असून ह्या मुळे वेळ व पैसा वाचणार आहे. ह्या रस्त्या वरील टोल ही अतिशय वाजवी आहे. ह्या रस्त्यावर जितके अंतर पार करू त्याच प्रमाणात टोल आकारला जातो. आज परदेशात गाडी चालवत असल्याचा अनुभव येत असल्याचे शरद काळे त्यांनी म्हटले आहे
काळे यांनी औरंगाबादच्या वेरूळ खुलताबाद रस्त्यावरून पुढे कन्नड तालुक्याजवळ समृद्धी महामार्गावर गाडी आणली. डिझेलची टाकी फुल केली. गाडीतील हवा आणि कुलंट चेक करून सीटबेल्ट लावला आणि आणि अक्सिलेटर वाढवला दुपारी ४ वाजून पन्नास मिनिटांनी त्यांनी कन्नड सोडले आणि ते अवघ्या तीन तासात म्हणजेच ७ वाजून ४७ मिनिटांनी नागपूरला पोहोचले. एकूण ४६५ किलोमीटर अंतर त्यांनी अवघ्या तीन तासात कापले. एक नवा विक्रम त्यांनी केला.
त्यांच्या या धाडसी मोहिमेचे सर्वत्र कौतुक होते आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या मार्गावरून गाडी चालवताना वेगाने गाडी चालविण्याचा मोह सर्वानाच होतो पण कुशल वाहनचालकांनीच हा प्रयत्न करावा, नवशिक्या किंवा क्वचितच गाडी चालविणाऱ्यानी हे धाडस करू नये असे आवाहन यशवंत डांगे आणि शरद काळे पाटील यांनी केले आहे.