संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूरकडे प्रस्थान

आषाढी वारीसाठी ज्ञानेश्वर माऊलींचे ज्येष्ठ बंधू व गुरु निवृत्तीनाथांची पालखी आज शुक्रवारी पायी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
यासाठी चोख व्यवस्था केली गेली असून निवृत्तीनाथांची पालखी ज्या चांदीच्या रथातून नेली जाते त्या रथाची व पालखीचे काम देवस्थानच्या वतीने पूर्ण झाले या पालखी समवेत परंपरेच्या व मानाच्या दिंड्या पायी पंढरपूर कडे जातात पूर्वी अल्प असलेली संख्या वाढत जाऊन आता 40 ते 45 लाख अशी झाली असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख नारायण ज्ञानदेव मुळात यांनी दिली. पालखी सोहळा आज शुक्रवारी दुपारी दोन वाजता समाधी मंदिरातून दिंडी समवेत सवाद्य मिरवणुकीने कुशावर्त तीर्थ व त्र्यंबकेश्वर मंदिराच्या समोर नाशिककडे रवाना होतील.पहिला मुक्काम पेगलवाडी येथील महानिर्वाणी आखाड्यात ठेवण्यात आला आहे.