अहमदनगरचा नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे लोकार्पण – ७/१२ चा ठरला मुहूर्त .

अहमदनगरचे जिलाधिकारी कार्यालय लवकरच स्थलांतरित होत असून याचे उदघाटन दिनांक ७ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.  तब्बल २८ कोट रुपये खर्च करून  नगर औरंगाबाद रोडवरील भूमी अभिलेख कार्यालयाचा जागेत हि इमारत उभारण्यात आली आहे . राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि  जिल्हाधिकरी  राजेंद्र भोसले यांचा देखरेखे खाली या इमारतीचे बांधकाम पूर्ण होत आहे .
सध्या या इमारतीचा अंतर्गत सजावटीचे काम करण्यात येत आहे . नगर चे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी बनवलेली  राजमुद्रा आणि महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचा दालनात लावण्यात येणार आहे, प्रमोद कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यलयात नुकतीच पाहणी केली  . जिल्हधिकारी कार्यालयचा मागील प्रस्तवात, जुने जिल्हाधिकारी कार्यलयात नगर निवास हे  जिल्हाधिकाऱ्यांचे निवास स्थान आणि  नियोजन भवन या इमारती कायम ठेऊन जुन्या निवासात जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी कार्यालयाचा इमारतीचा जागी भव्य इमारत उभारण्याचा प्रस्ताव होता .नियोजन  भवन व नवी इमारत स्काय वॉल्क  ने जोडण्या चे  प्रस्तावत होते .त्यासाठी ९ कोटी रुपये खर्च होता पण या जागेत अडचणी आल्याने हा प्रस्ताव रद्ध करून नवे कार्यालय उभारण्याचे नियोजन करान्यात  आले  त्या साठी २८ कोटी ५७लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली . १३३६७ चौ मीटर क्षेत्रावर हि भव्य इमारत उभी राहिली आहे .तळ  मजल्यावर वाहन तळ असून  ५ माजली इमारत आहे. यात जिल्हाधिकाऱ्यांचे दालन विस्तृत असून त्यांचा दालनात दर्शनी भागात प्रमोद कांबळे यांनी बनवलेल्या शिल्प कृती ठेवण्यात येणार आहेत . येत्या ७ डिसेंमबर रोजी या नूतन कार्यालयाचे उदघाटन होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे .