आढळगावातील एका व्यक्तीच्या विरोधात संपूर्ण गावकऱ्याचे जिल्हा परिषदेच्या आवारात उपोषण.

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा येथील आढळगावातील अनिल ठवाळ हा व्यक्ती गावातील विकास कामांच्या तक्रारी करत असून अनेक अधिकारी/कर्मचारी/ठेकेदार यांच्या विरोधात पत्र, तक्रारी, चौकशा लावत त्यांच्या खोट्या तक्रारी करुन उपोषण, आंदोलने करत अधिकारी वर्ग काम करण्यास तयार नाही. सततच्या तक्रारीमुळे अनेक अधिकारी व ठेकेदार यांनी गावाचे विकास कामे हे ठप्प केलेली आहेत अनेक सरकारी योजनेची कामे रखडली जातात. खोट्या तक्रारी करणे यातून स्वतःचे हित साधने हा त्यांचा व्यवसाय असून सदरील व्यक्तींवर कारवाई होण्यासाठी व त्यांच्या संपत्तीची सकोल चौकशी करुन कारवाई करण्याच्या मागणीसाठी आढळगावच्या ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेच्या आवारात उपोषण करण्यात आले. यावेळी गावचे सरपंच शिवप्रसाद उबाळे, शरद जमदाडे, सोसायटीचे चेअरमन दादासाहेब गव्हाणे, मा.सरपंच जिजाराम डोके, ग्रामपंचायत सदस्य मनोहर शिंदे, हनुमंत डोके, अनिल शिंदे, नितीन गव्हाणे, मधुकर गिरमकर, सत्यवान शिंदे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे निवेदनात म्हटले आहे की 1990 ते 2023 पर्यंत हजारो लाखो खोट्या तक्रारी अर्ज जिल्हा परिषदेच्या कार्यालयाला आलेले आहे. खोट्या तक्रारी करणाऱ्या अनिल ठवाळ यांच्या पत्राची तक्रारीची पुराव्या शिवाय दखल घेतली जाऊ नये व तक्रार करणाऱ्या व्यक्तीस प्रतिबंधक घालण्यात यावा सदर इसम सराईत तक्रारदार असून खोट्या तक्रारीला कंटाळून व गावातील विकास कामे बंद पडल्याच्या विरोधात तसेच शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक करत असल्याच्या निषेधार्थ अनिल ठवाळ या व्यक्तीवर फायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद कार्यालय समोर उपोषण चालू करण्यात आले आहे…………..