आदिवासी पारधी समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वाळू उपसा करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून ग्रामपंचायत सदस्य आकाश दळवी यांना जिवे मारण्याचा प्रयत्न.

अहमदनगर (प्रतिनिधी)- बार्शी येथील खांडवी गावातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आकाश पांडुरंग दळवी यांच्यावर गावात अनधिकृतपणे वाळू उपसा करणारे समाधान बर्डे, बप्पा कदम, कौशिक पाटील, आशुतोष गव्हाणे, संदीप जाधव, दयानंद देसाई यांच्या विरोधात तक्रार पोलीस स्टेशनला केल्यामुळे याचा राग मनात धरून वरील सर्व आरोपींनी आकाश दळवी, प्रवीण भोसले, रामराजे चोरघडे यांच्यावर जीव घेणा हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची फिर्याद बार्शी तालुका पोलीस स्टेशन येथे घडलीअसून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरील आरोपींना शिक्षा होण्यासाठी जलद गतीने तपास करण्याच्या मागणीसाठी आदिवासी पारधी समाज संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देताना आदिवासी पारधी समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अजित भोसले समवेत छाया भोसले, अक्षय भोसले आदी उपस्थित होते.  पुढे निवेदनात म्हटले आहे की सर्व आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात यावे व आरोपीने फिर्यादीला व त्यांच्या मित्राला केलेल्या धमकीचे फोनचे रेकॉर्ड काढण्यात यावे. तसेच आरोपींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच सदर प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा व यापूर्वी पीडित साक्षीदार यांनी आरोपीवर बेकायदेशीर वाळू उपसा होऊ नये म्हणून दिलेल्या सर्व अर्जाची साक्षांकी प्रत ग्रामपंचायत ठरवायची प्रत व हरित लवाद यांच्याकडे केलेल्या पाठपुरावाच्या प्रति तहसीलदार प्रांत.जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त करून दोषारोप पत्रात समाविष्ट करण्यात यावे अशा विविध मागणी करुन आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे