उद्योजक लिंबाशेठ (दादा) नागरगोजे यांचा वाढदिवस विविनि सामाजिक उपक्रमाने साजरा.

इतर खर्चाला फाटा देत गोरगरीब निराधारांना शाळेय साहित्य व मिष्टान्न भोजन वाटप.

अहमदनगर (प्रतिनिधी)- उद्योजक लिंबाशेठ (दादा) नागरगोजे यांच्या वाढदिवसानिमित्त एमआयडीसी येथील सह्याद्री चौक येथे कुठल्याही प्रकारची जाहिरात बाजी आतिश बाजी न करता इतर खर्चेला फाटा देत आदर्श आश्रम, सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा फाउंडेशन व मानवता जन आंदोलनाच्या वतीने सामाजिक भावनेने गोरगरीब निराधार विद्यार्थ्यांना शाळेय साहित्य व मिष्टान्न भोजन वाटप करण्यात आले यावेळी उद्योजक लिंबाशेठ (दादा) नागरगोजे समवेत अशोक बडे, केशव नागरगोजे, अनिल नागरगोजे, भैय्या भोरे, बाळासाहेब बडे, प्रवीण सप्रे, अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे बाळासाहेब मोरे, प्रमोद वाघमारे, कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, जिजाभाऊ जाधव, मानवता जन आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष विजय पाथरे, दीपक जाधव, मेजर उल्हारे, नितीन खंदारे, रमेश भिंगारदिवे, कर्मा वाखरे, संदीप घोरपडे आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे बाळासाहेब मोरे म्हणाले की उद्योजक लिंबाशेठ (दादा) नागरगोजे यांच्या वाढदिवसानिमित्त इतर सर्व खर्चाला फाटा देत सामाजिक भावनेने समाजातील घटक असलेले गरजूंना आधार देण्यासाठी शाळेय साहित्य वाटप करून सह्याद्री चौक येथे मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले असल्याची भावना व्यक्त केली…………………