कल्याण रोडवरील संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत योग दिवस साजरा

त्रिपुर योगाच्या योग मार्गदर्शक सौं निनाद ढोरे यांच्या निर्देशनाखाली शिक्षक आणि मुलांनी केला योगाभ्यास

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण जगभर ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस सर्वत्र विविध उपक्रमांनी उत्साहत साजरा झाला. अहमदनगर मध्ये नगर कल्याण रोडवरील संस्कृती श्रीनिवास कानोरे प्रशालेत योग दिन निमित्त योगसाधना करण्यात आली . विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्सहात यात सहभाग नोंदवला. नगर मधील त्रिपुर योगाच्या प्रमुख मार्गदर्शक सौ निनाद राजू ढोरे यांच्या निर्देशानुसार योग मुलांना शिकवण्यात आला होता. त्यासाठी मुलांचा दिनांक १८ जून पासून सराव करून घेण्यात आला. विद्यालयाच्या निसर्गरम्य अशा परिसरात ही यो साधना करण्यात आली. केंद्र सरकारने दिलेल्या प्रोटोकॉल नुसार सर्व योगासने व्यायाम आणि प्रयाणायामाचे प्रकार सर्वाकडून करवून घेण्यात आले.
 स्वकुल साळी हित्वर्धक मंडळाच्या  श्री लक्ष्मी नारायण शिशु शिक्षण मंदिर संचालित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेतील  ३०० योगसाधाकांनी ही योगसाधना केली.
मुख्यध्यापिका सौ. कल्पना भाम्बरे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. सौ, निनाद ढोरे यांनी सुरुवातीला योग प्रार्थना म्हंटली नंतर त्यांनी त्या प्रार्थनेचा अर्थ सांगितला. ओंकार साधनेनंतर सर्व योग करवून घेण्यात आले. यावेळी त्रिपुर योगाच्या रोहिणी कुलकर्णी, गायत्री कुलकर्णी, शेहनाज शेख, पूनम कवडे, हसीना शेख, मेधा भट, शीतल भट, वनिता पवळ, हेमलता सुपेकर, संगीता भोसले, कल्पना आडसूळ, दीपा कांबळे, संगीता बिज्जा, कांचन कवडे, ज्योती गांधी, मुक्ता ढोरे या योगसाधकांनाही या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला आणि योगाभ्यास केला. कानोरे प्रशालेचे उपशिक्षक जगन्नाथ कांबळे. राजेंद्र गर्जे,  सौ. चंदा कार्ले , नम्रता म्यामड्याल, सौ वर्षा केदारे, सौ. विद्या नरसाळे, श्वेता राऊत यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्य केले.
सौ. निनाद ढोरे या त्रिपूर योग हा वर्ग चितळे रोड येथील ऋग्वेद भवन इथे सकाळी ६ ते ८ आणि सायंकाळी ४ ते ५.३० या वेळेत चालवीत असून नगरमधील शेकडो योग साधक त्यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करीत आहेत.